शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

शहराबाहेरील रेडीमेड घरांना पसंती; घर बांधणे अनेकांना आता वाटतं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 3:35 PM

गुंतवणुकीवर भर : कर्ज काढून होत आहे प्लॉटची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : रिकामे प्लॉट खरेदी करून त्यावर घर बांधणे अनेकांना आता कठीण होत आहे. त्यामुळे इतर मोठ्या शहरांप्रमाणेच गडचिरोली जिल्ह्यातही फ्लॅटची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

शहरात वास्तव्यास असलेले अनेक नागरिक ग्रामीण भागात आले आहेत. ग्रामीण भागात प्रशस्त जागा राहते. त्यामुळे शहरात प्लॉट खरेदी करतानाही लाख रुपये अधिक गेले तरी मोठा प्लॉट खरेदी करून त्यावर घर बांधण्याची मानसिकता आहे. मात्र, ८ ते १० लाखांचा प्लॉट खरेदी करून त्यावर २० लाखांचे घर बांधणे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यामुळे आता गडचिरोली शहरातही लहान आकारातील अपार्टमेंटची संकल्पना पुढे येत आहे. एखाद्या बिल्डरने अपार्टमेंट बांधल्यानंतर नागरिक रेडीमेड घर खरेदी करीत आहेत. 

जुन्या घरांनाही ग्राहक मिळेना शहरात ८० पेक्षा अधिक जुने घर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे घर जुन्या पद्धतीचे असल्याने या घरांना ग्राहक मिळत नसल्याची माहिती आहे. अनेक घरांपुढे गेल्या तीन-चार वर्षांपासून पाट्या लागून आहेत.

फ्लॅटचे कोणत्या भागात काय दर ! 

  • गडचिरोली मुख्य शहर : गडचिरोली शहरातील मुख्य वस्त्यांमध्ये काही ठिकाणी फ्लॅटचे बांधकाम केले जात आहे. १५ ते २० लाख रूपये होतात . १५ ते २० लाख रुपये किमतीने फ्लॅट उपलब्ध आहेत. 
  • नवेगाव मार्ग : फ्लॅटचे बांधकाम केले जात आहे. या परिसरात थोडे स्वस्त दरात फ्लॅट उपलब्ध बांधकाम केले जात आहे. प्लॉटच्या तुलनेत फ्लॅट स्वस्तात मिळत असल्याने अनेक नागरिक फ्लॅट खरेदी करत आहेत. 
  • आरमोरी मार्ग : आरमोरी मार्गावरही काही ठिकाणी फ्लॅटचे बांधकाम केले जात आहे. नवीन वस्त्यांमध्ये या फ्लॅटचे बांधकाम होत आहे. अयोध्यानगरातही फ्लॅटचे बांधकाम पुर्ण झाले आहे.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली