लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ परिसरात १५ ते १८ जानेवारीदरम्यान आविष्कार महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवात महाराष्ट्राच्या २० विद्यापीठातील जवळपास ६५० संशोधक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. राज्यस्तरावरील होणाऱ्या या महोत्सवाची विद्यापीठ प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे.विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक वृत्तींना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्यपाल कार्यालयाने आविष्कार २०१८ चे आयोजन करण्याबाबतची जबाबदारी यावर्षी गोंडवाना विद्यापीठाकडे सोपविली आहे. या आविष्कार महोत्सवाचे उद्घाटन केंद्र सरकारच्या अॅटॉमिक एनर्जी कमिशन अॅण्ड सेक्रेटरी डिपार्टमेंट आॅफ अॅटॉमिक एनर्जीचे चेअरमन के.एन.व्यास यांच्या हस्ते होणार आहे.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रिक्टर डिझाईन अॅण्ड डेव्हलपमेंट ग्रुप, भाभा अॅटॉमिक रिसर्ज सेंटरचे असोसिएट डायरेक्टर पी.आर.पाटील उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर राहणार आहेत.याशिवाय विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.सी.व्ही. भुसारी, कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सदर चारदिवसीय आविष्कार महोत्सवात महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, राहुळी, परभणी, अकोला आदीसह सर्वच कृषी व अकृषी मिळून २० विद्यापीठातील जवळपास ६५० संशोधक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. एका विद्यापीठातून ५० ते ६० विद्यार्थी गडचिरोलीत येणार आहेत. सदर महोत्सवासाठी विद्यापीठ परिसरात प्रशस्त शामियाना उभारण्यात येत आहे.सदर महोत्सवाचा समारोप १८ जानेवारीला डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम.भाले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवात पोस्टर प्रेझेटेंशन, मॉडेल प्रदर्शनी तसेच विद्यार्थ्यांचे मौखीक सादरीकरण होणार आहे.
आविष्कार महोत्सवाची तयारी जोमात सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 1:34 AM
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ परिसरात १५ ते १८ जानेवारीदरम्यान आविष्कार महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवात महाराष्ट्राच्या २० विद्यापीठातील जवळपास ६५० संशोधक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
ठळक मुद्दे१५ पासून आयोजन : २० विद्यापीठातील ६५० संशोधक विद्यार्थी येणार