शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

आरोग्यपत्रिका तयार

By admin | Published: May 30, 2014 12:02 AM

कृषी विभाग व मृद संधारण विभागाच्यावतीने जिल्ह्यात दरवर्षी पीक लागवडीसाठी वापर होत असलेल्या जमिनीची चाचणी करण्यात येते. गतवर्षीही जिल्ह्यात मृद सर्वेक्षण व चाचणी करण्यात आली.

मृद सर्वेक्षण व चाचणी : १४ हजार ७१२ आरोग्यपत्रिकागडचिरोली : कृषी विभाग व मृद संधारण विभागाच्यावतीने जिल्ह्यात दरवर्षी पीक लागवडीसाठी वापर होत असलेल्या जमिनीची चाचणी करण्यात येते. गतवर्षीही जिल्ह्यात मृद सर्वेक्षण व चाचणी करण्यात आली. चाचणीचे सर्व सोपस्कार पार पडल्यानतर एकूण १४ हजार ७१२ आरोग्य पत्रिका तयार करून वितरित करण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्र १४ लाख ४८ हजार २७२ हेक्टर आहे. जमिनीचा उतार ३ टक्के आहे. सन २0१३-१४ या वर्षात कृषी विभागाकडे १0 हजार ४२४ मृद नमुने प्राप्त झाले. तसेच मार्च २0१४ अखेर २ हजार ६६४ नमुने शिल्लक होते. दोन्ही मिळून एकूण १३ हजार ५८ मृद नमुने तपासणीस उपलब्ध झाले आहे. त्यापैकी या वर्षामध्ये ८ हजार ८२५ सर्वसाधारण मृद नमुन्याची चाचणी करण्यात आली. यावरून गडचिरोली जिल्ह्याचा सुपिकता निर्देशांक व सुपिकतेची पातळी तयार करण्यात आली. जिल्ह्याचा नत्र, स्फुरद, पालाश या गुणधर्माचा सुपीकतेचा निर्देशांक अनुक्रमे १.२४, १.३२ व २.४४ आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार नत्राची सुपिकता पातळी कमी असून खताची मात्रा २५ टक्के वाढवून देण्यात आली. स्फुरद गुणधर्माची मात्रा मध्यम असून पालाश गुणधर्माची मात्रा भरपूर प्रमाणात आहे. तसेच पालाश खताची मात्रा २५ टक्क्याने कमी करून देण्याबाबत कृषी विभागाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यात ८३ टक्के आम्लधर्मी, १६ टक्के सर्वसाधारण, १ टक्के विम्लधर्मी प्रकारची जमीन आहे. पाण्याची प्रतवारी पिकासाठी खराब २ टक्के, उच्चप्रतीचे ५४ टक्के व मध्यम ४४ टक्के आहे. जिल्ह्यात मृदमाला ९ असून जमिनीचा रंग पिवळसर तपकिरी आहे. कृषी विभागाच्यावतीने दरवर्षी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद चाचणी करण्यात येते. गतवर्षी २0१३-१४ मध्ये एकूण सर्वसाधारण  नुमने ६ हजार २९९ व सुक्ष्म नमुने ६ हजार ९९ प्राप्त झाले. यापैकी सर्वसाधारण ५ हजार ३ व सुक्ष्म ५ हजार ३ नमुन्याचे पृथ:करण करण्यात आले. यात गतवर्षी ५ हजार ३ आरोग्य पत्रिकाचे वितरण करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)