लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) महानिरीक्षक टी.शेखर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले. २०१८ मध्ये उपमहानिरीक्षक म्हणून गडचिरोलीतील नक्षलविरोधी अभियानात त्यांच्या मार्गदर्शनात अनेक यशस्वी कारवाया झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना बढती देण्यात आली.ते सध्या कर्नाटकमधील बेळगाव येथे जंगलातील लढायांचे प्रशिक्षण देणाऱ्या कोब्रा स्कूलचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.१९८६ मध्ये सीआरपीएफ मध्ये डीवायएसपी म्हणून रुजू झालेल्या टी.शेखर यांनी आतापर्यंत पंजाब, जम्मू-काश्मिर, आसाम, त्रिपुरा, मणीपूर आणि महाराष्ट्र आदी भागात सेवा दिली आहे. दहशतवादविरोधी आणि नक्षलविरोधी अभियान राबविण्यात त्यांचा हातखंडा आहे.१९८९ ते १९९८ यादरम्यान त्यांची प्रतिनियुक्ती ‘एसपीजी’ मध्ये झाली. त्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान, माजी पंतप्रधानांसारख्या व्हीव्हीआयपींची सुरक्षा व्यवस्था सांभाळली आहे. त्यासाठी त्यांना यापूर्वीही दोन वेळा कठीण भागातील सेवेसाठी मिळणाºया पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.
महानिरीक्षक टी.शेखर यांना राष्ट्रपती पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:50 PM
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) महानिरीक्षक टी.शेखर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले. २०१८ मध्ये उपमहानिरीक्षक म्हणून गडचिरोलीतील नक्षलविरोधी अभियानात त्यांच्या मार्गदर्शनात अनेक यशस्वी कारवाया झाल्या होत्या.
ठळक मुद्देनक्षलविरोधी अभियानातील यशानंतर बढती