गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलात नक्षली कारवायांना आळा घालण्यासाठी विशेष कामगिरी केल्याबद्दल २८ पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपतींचे ‘पोलिस शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. राज्यपालांच्या हस्ते त्यांना सदर पदक बहाल करून सन्मानित केले जाणार आहे. यात औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे पोलीस हवालदार देवेंद्र आत्राम हे एकाच वर्षी दोन पदकांचे मानकरी ठरले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्यपदक जाहीर झाले. त्यात गडचिरोलीचे तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक आणि सध्या औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक असलेले मनीष कलवानिया, पोलिस निरीक्षक संदीप पुंजा मंडलिक, पोलिस निरीक्षक अमोल नानासाहेब फडतरे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल बाळासाहेब नामदे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील विश्वास बागल, सहायक पोलिस निरीक्षक योगीराज रामदास जाधव, पोलिस उपनिरीक्षक सदाशिव नामदेव देशमुख, उपनिरीक्षक प्रेमकुमार लहू दांडेकर, उपनिरीक्षक राहुल विठ्ठल आव्हाड, सहायक फौजदार देवाजी कोत्तुजी कोवासे, हवालदार देवेंद्र पुरुषोत्तम आत्राम, हवालदार देवेंद्र पुरुषोत्तम आत्राम, हवालदार राजेंद्र अंताराम मडावी, हवालदार नांगसू पंजामी उसेंडी, नायक अंमलदार सुभाष भजनराय पदा, अंमलदार रामा मैनु कोवाची, प्रदीप विनायक भसारकर, दिनेश पांडुरंग गावडे, एकनाथ बारीकराव सिडाम, प्रकाश श्रीरंग नरोटे, शंकर दसरू पुंगाटी, गणेश शंकर डोहे, सुधाकर मानू कोवाची, नंदेश्वर सोमा मडावी, भाऊजी रघु मडावी, शिवाजी मोडू उसेंडी, गंगाधर केरबा कराड, महेश पोचम मादेशी आणि स्वप्निल केसरी पदा यांचा समावेश आहे.
पोलिस शौर्यपदक प्राप्त सर्व अधिकारी आणि अंमलदारांपैकी कलवानिया यांच्याशिवाय इतर सर्वजण सध्या गडचिरोली जिल्ह्यातच कार्यरत आहेत.