शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उष्माघातापासून बचाव करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:56 AM

१ एप्रिल ते ३० जून या कालावधीमध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे मृत्यू होणे संभवणीय असते. उष्माघाताने मृत्यू होऊ नये म्हणून नागरिकांनी आतापासूनच जागृत राहीले पाहिजे.

ठळक मुद्देउन्हात काम करणे टाळा : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १ एप्रिल ते ३० जून या कालावधीमध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे मृत्यू होणे संभवणीय असते. उष्माघाताने मृत्यू होऊ नये म्हणून नागरिकांनी आतापासूनच जागृत राहीले पाहिजे. रुग्णाला तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालये संबंध साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी केले आहे.उन्हाळयामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळकरणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो. उष्माघात झाल्यानंतर थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता , बेशुद्वावस्था आदी लक्षणे दिसून येतात. उष्माघात होऊ नये, यासाठी वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावी, उष्णता शोषून घेणारे कपडे वापरावेत, काळया किंवा भडक रंगाचे कपडे वापरु नयेत. सैल, पांढºया रंगाचे कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे, उन्हामध्ये काम करताना मधून मधून थोडीशी विश्रांती घ्यावी, उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम थांबवावे, उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा, असे आवाहन डॉ. शशिकांत शंभरकर यांनी केले आहे.उष्माघात झाल्यानंतर हे उपाय कराउष्माघात झाल्यानंतर रुग्णाला हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर सुरू करावे, शक्य असल्यास वातानुकूलीत खोलीत ठेवावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक लावावेत, आवश्यकतेनुसार शिरेवाटे सलाईन लावावेत. हे उपाय केल्यास उष्माघात नियंत्रणात येण्यास मदत होते. या घरगुती उपायाबरोबरच नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा. तसेच जवळपासच्या रूग्णालयास संबंधित रूग्णाला तत्काळ भरती करावे.