गडचिराेली : अफगाणिस्तान देशातील सत्तांतरासाठी निर्माण झालेल्या तणावामुळे तेथून आयात हाेणाऱ्या ड्रायफ्रूट्सच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, ५० ते १०० रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. परंतु गेल्या पंधरवड्यापासूनच जिल्ह्यात ड्रायफ्रूट्सचे दर वधारण्यास सुरुवात झाली हाेती.
दीड वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका असल्याने राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेकजण ड्रायफ्रूट्सचा वापर करीत आहेत. त्यामुळे मागणीही बऱ्याच प्रमाणात वाढली. शहरी भागात अधिक मागणी दिसून येते. मात्र ग्रामीण भागात स्थानिक वस्तूंनाच प्राधान्य दिले जाते. अफगाणिस्तानात तणाव वाढल्याने तेथून आयात हाेणारे अंजीर, काळा व लाल मनुका यांच्या दरवाढीवर परिणाम झाला आहे.
बाॅक्स .....
स्टाॅकवर फारसा परिणाम नाही
n गडचिराेली जिल्ह्यात माेजक्याच प्रमाणात ड्रायफ्रूट्सची विक्री हाेते. माेठ्या व्यापाऱ्यांकडून आवश्यक प्रमाणातच किरकाेळ व्यापाऱ्यांना पुरवठा केला जाताे. स्टाॅक करण्याचे लिमिट नसल्याने व अफगाणिस्तानातील तणावाचा फारसा परिणाम न झाल्याने जिल्ह्यात मागणीनुसारच ड्रायफ्रूट्सचा पुरवठा सुरू आहे.
काेट .......
राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ड्रायफ्रूट्सचा वापर केला जाताे. काेराेना काळात ही मागणी वाढली. कॅलिफाेर्नियातून बदाम आयात केले जाते. तेथे कमी पाऊस पडल्याने आयात घटून दर वाढले. अफगाणिस्तानातून येणाऱ्या मनुक्याचेही दर वाढले आहेत. ते आता पूर्ववत कमी हाेण्याची शक्यता कमीच आहे.
- नूरअल्ली बताडा, व्यावसायिक
काेट .......
अफगाणिस्तानातून अंजीर, काळा व लाल मनुका आयात हाेतो. सध्या माेठ्या व्यापाऱ्यांकडून ५० ते १०० रुपये प्रतिकिलाे दरवाढ करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ड्रायफ्रूट्सचे दर वाढले आहेत. यापुढेही दर वाढण्याची शक्यता आहे. भरपूर प्रमाणात आयात झाल्याशिवाय वाढलेले दर कमी हाेणार नाहीत.
- विवेक डेंगानी, व्यावसायिक
बाॅक्स ......
हे पाहा भाव (प्रतिकिलाे)
तणावपूर्वीचे भाव सध्याचे भाव
मनुका ३२० ४००
बदाम ७०० ९००
अंजीर ७०० १०००
किसमिस २२० २८०