गट ‘ब’ ९ ते १२ यामध्ये प्रथम पुरस्कार अनुज नारनवरे याला ३,००० रु. चे बक्षीस जि. प.सदस्या रुपाली पंदिलवार यांचे हस्ते देण्यात आले. द्वितीय पुरस्कार वैष्णव पाल याला २,००० रु.चे बक्षीस सरपंच बेबी बुरांडे यांचे हस्ते देण्यात आले. तृतीय पुरस्कार विशाल नारनवरे याला १,००० रु.चे बक्षीस ग्रामसेवक इंद्रावन बारसागडे यांचे हस्ते देण्यात आले. गट ‘अ’ ५ ते ८ यामध्ये प्रथम पुरस्कार यश धोटे याला ३,००० रु. चे बक्षीस प्रभारी पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांचे हस्ते देण्यात आले. द्वितीय पुरस्कार मानसी यारेवार हिला १,५०० रु.चे बक्षीस सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र मडावी यांचे हस्ते देण्यात आले. तृतीय पुरस्कार गौरव चतुर याला १,५०० रु.चे बक्षीस पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे यांचे हस्ते देण्यात आले . याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे , ग्रा.पं.सदस्य कपील पाल , संतोष बारापात्रे, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार व मंडळाचे कार्यकर्ते हजर होते.
सामान्य ज्ञान परीक्षेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:37 AM