चामाेर्शी : येथील जा. कृ. बाेमनवार विद्यालयात स्वातंत्र्यसंग्राम सैनिक दलितमित्र तथा श्री गुरूकृपा समाजसेवी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष जागाेबा कृष्णाजी बाेमनवार यांची जयंती १० फेब्रुवारीला साजरी करण्यात आली. या निमित्ताने रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरणसुद्धा करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्र. साे. गुंडावार हाेते. उद्घाटन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून उपअभियंता आशिष आवळे, संस्थाध्यक्ष छाया बाेमनवार, रवी बाेमनवार, आनंद बरीलानी, किशाेर गायकवाड, वासुदेव खापरे, कनिष्ठ अभियंता नारायण लंजे, शंकर पुडावले, अभिषेक बाेमनवार, नम्रता बाेमनवार, प्राचार्य महेश तुम्पल्लीवार, पर्यवेक्षक आय. जी. चांदेकर, एन. डब्ल्यू. कापगते उपस्थित हाेते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जा. कृ. बाेमनवार यांच्या प्रतिमेसमाेर अभिवादन केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गाेंडी नृत्य सादर केले. त्यानंतर विवेक मिश्रा यांनी वाहतुकीचे नियम, काळजी, खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले. दरम्यान एस. जी. कंट्रक्शन कंपनीतर्फे रस्ते वाहतूक सुरक्षा या विषयावर चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात अनुक्रमे ४५ व १५ स्पर्धकांनी भाग घेतला. यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते शिल्ड, प्रमाणपत्र तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. संचालन प्रा. दिलीप साेमनकर तर आभार राकेश इन्कणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बाॅक्स .....
हे आहेत विजेते
चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक इयत्ता दहावीची ऐश्वर्या यशवंत भरणे, द्वितीय क्रमांक जाई संताेष सुरावार, तृतीय क्रमांक इयत्ता नववीची धनश्री सहदेव बाेदलकर हिने पटकाविला तर प्राेत्साहन बक्षीस इयत्ता दहावीचा आर्यन जनार्दन गव्हारे याला देण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक इयत्ता बारावीची वैष्णवी विजय बहिरेवार, द्वितीय क्रमांक इयत्ता अकरावीची अमृता हेमराज चलाख तर तृतीय क्रमांक इयत्ता दहावीची प्राजक्ता अंकुश सातपुते हिने पटकाविला.