भारतीय दूरसंचार निगम लिमिटेेडच्या वतीने जिल्हाभर भ्रमणध्वनी टाॅवर उभारण्यात आले. मात्र दुर्गम भागात टाॅवर उभारणीकडे दुर्लक्ष झाले. काही टाॅवर उभारण्यात आले व बॅटऱ्याही उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र मुंगनेर भागात भ्रमणध्वनी मनाेऱ्याचा अभाव आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी व दूरध्वनीधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागात बीएसएनएल व इतर खासगी कपंन्यांचा कव्हरेज नसल्याने संपर्काची समस्या बिकट बनली आहे. मुंगनेर परिसरात बाेदीनसह अठ ते नऊ गावे आहेत. या गावातील नागरिकांचा मुंगनेरशी अनेकदा संपर्क येताे. हा परिसर नक्षलग्रस्त असल्याने कव्हरेजची समस्या अद्यापही सुटली नाही. या ठिकाणी टाॅवर उभारावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स .....
ऑनलाईन दाखले मिळेना
मुंगनेर या अतिदुर्गम भागाचा विकास राखडला आहे. विद्युत समस्याही निर्माण झाली आहे. सध्या शासकीय याेजनांची अंमलबजावणी इतर सर्व कामे ऑनलाईन करावे लागत आहे. अनेक माेबाईलधारक स्मार्ट फाेनच्या माध्यमातून ऑनलाईन कामे करण्याचा प्रयत्न करतात. मात्र या भागात कव्हरेज नसल्याने विद्यार्थी व नागरिकांना ऑनलाईन दाखले मिळण्यास अडचणी येत आहेत. धानाेरा तसेच पेंढरी येथे जाऊन कामे करावी लागत आहेत.