ठळक मुद्देकृषी कल्याण अभियानाचा समारोप : शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची दिली माहिती
<p>लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना मार्गदर्शनही केले.आकांक्षित जिल्हा विकास कार्यक्रमाअंतर्गत १ जून ते ३१ जुलै या कालावधीत कृषी कल्याण अभियानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सांगता जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत चामोर्शी तालुक्यातील वसंतपूर या गावी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. कार्यक्रमाला सरपंच तपन सरकार, पंचायत समिती उपसभापती बिश्वास, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, पशुसंवर्धन आयुक्त डॉ.संगीता निरगुडकर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.बोथीकर, डॉ.ताथोड, डॉ.कदम, तालुका कृषी अधिकारी राजपूत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हेमंतकुमार उंदीरवाडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना, मृदा आरोग्य पत्रिका, पीक कर्ज योजना, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स व्यवसाय, जीवन सुरक्षा योजना, ग्राम स्वराज्य अभियान या विषयांवर शेतकºयांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची कृषीविषयक माहिती असलेली दैनंदिनी पुस्तक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. त्यातील तांत्रिक माहितीचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असे सूचित केले. शेतकऱ्यांना फळरोपे, मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाला वसंतपूर परिसरातील शेकडो शेतकरी व नागरिक उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्याचा सहावा क्रमांककृषी कल्याण अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांच्या आधारे गडचिरोली जिल्ह्याचा अखिल भारतीय स्तरावर सहावा क्रमांक आहे. मागील आठवड्यात गडचिरोली जिल्ह्याने चवथ्या क्रमांकावर झेप घेतली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत उर्वरित लक्षांक पूर्ती करून पहिल्या पाचमध्ये क्रमांक मिळविण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.कृषी कल्याण अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याला दिलेल्या लक्ष्यापैकी सद्य:स्थितीत ९९ टक्के मृद आरोग्य पत्रिका वितरणाचे उद्दिष्ट गाठले आहे. तसेच फळ रोपांचे वाटप १०२ टक्के, मिनीकिट बियाणे वाटप ११३ टक्के, नाडेप १२ टक्के, कृत्रिम रेतन १५ टक्के, लसीकरण ९७ टक्के एवढे उद्दिष्ट गाठले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या शेतकऱ्यांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:55 PM