यावेळी आविका संस्थेचे उपाध्यक्ष तथा आविका पदाधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, कुरखेडा आविका अध्यक्ष बाबूराव तुलावी, संघटनेचे मार्गदर्शक माधव तलमले, व्यवस्थापक संघटनेचे अध्यक्ष हेमंत सेंदरे ,सचिव महेंद्र मेश्राम, लीलाधर घोसेकर व पदाधिकारी व्यवस्थापक उपस्थित होते. आविमचे महाव्यवस्थापक राठोड यांच्यांसोबत जिल्हा प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार, कुरखेडा उपप्रादेशिक व्यवस्थापक एम. एस. बावणे, कोरची उपप्रादेशिक व्यवस्थापक चौधरी उपस्थित होते. यावेळी शेतकरी बांधवांचे चुकारे त्वरित देण्यात यावे. मागील दाेन वर्षांमधील मंडी चार्जैस व कमिशन देण्यात यावे. मागील हंगाम मधील शेतकऱ्यांचे बारदाना रक्कम त्वरित घ्यावी. वनपट्टेधारक शेतकरी यांचे धान खरेदी व चुकारे संदर्भातील अडचणी त्वरित दूर करावी. चालु हंगामातील धानाची त्वरित उचल करावी या प्रमुख मागणीसह विविध मागणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आले. यावेळी संचालक महाव्यवस्थापक राठोड यांनी सदर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
महाव्यवस्थापकांकडे मांडल्या आविका संस्थांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:35 AM