लोकमत न्यूज नेटवर्कघोट : जिल्हाधिकाऱ्यांनी जवाहर नवोदय विद्यालयाला सोमवारी भेट देऊन या विद्यालयातील समस्या जाणून घेतल्या. तसेच पालकांसोबत चर्चा केली.केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत घोट येथे जवाहर नवोदय विद्यालय चालविले जाते. या विद्यालयाच्या इमारतीत भौतिक सुविधांची कमतरता असल्याच्या तक्रारी आहेत. सोमवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवोदय विद्यालयाला भेट देऊन समस्यांबाबत पालकांसोबत चर्चा केली. जवाहर नवोदय विद्यालयाच्या विस्तारीत बांधकामासाठी जमीन आवश्यक आहे. सदर जमीन वन विभागाची आहे. वन विभागाकडून जमीन मिळण्यासाठी प्रयत्न केले जाईल. विद्यालय परिसरात संरक्षण भिंत, रस्ते, पथदिवे, शुध्द पाणी विद्यालयाच्या वसतिगृह दुरूस्तीकरिता व सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना दिले.समस्यासंदर्भात विद्यालयातच आढावा बैठकीत आयोजित केली होती. आढावा बैठकीला प्राचार्य जी. कोटय्या, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उरकुडे, नायब तहसीलदार अविनाश पिसाळ, उपप्राचार्य साधना दलेला, घोटचे वन परिक्षेत्राधिकारी शेखर तनपुरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांनी आढावा बैठकीनंतर मुले, मुलींच्या वसतिगृह व भोजन कक्षाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नवोदय विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी समस्यांचे निवेदन सादर केले. यावेळी नवोदय विद्यालय, पालक समितीचे कार्याध्यक्ष ओमप्रकाश साखरे, नरेश जांपलवार, एम. व्ही. कळते, अरूण पत्रे, नितीन भडांगे, रवींद्र आयतुलवार, पुंडलिक पेंदाम, शरद पाथर्डे, राजीव येलेवार, रोशन उके, बंडू तिलगामे, पुरूषोत्तम चापले, सोहन मोहरकर आदी उपस्थित होते.नवीन इमारतीची गरजनवोदय विद्यालयाची इमारत जुनी आहे. जुन्या स्ट्रक्चर प्रमाणे या इमारतीचे बांधकाम आहे. नवीन स्ट्रक्चरप्रमाणे इमारतीचे बांधकाम असणे आवश्यक आहे. तसेच वसतिगृहात विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरविण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या नवोदय विद्यालयाच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:56 PM
जिल्हाधिकाऱ्यांनी जवाहर नवोदय विद्यालयाला सोमवारी भेट देऊन या विद्यालयातील समस्या जाणून घेतल्या. तसेच पालकांसोबत चर्चा केली.
ठळक मुद्देवसतिगृहाची पाहणी : प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना