ठळक मुद्देमहावितरणचा कानाडोळा : धानपिसाईसाठी करावी लागते प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून विजेच्या लपंडावाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तीन ते चार तास वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना आपल्या कामासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.दर मंगळवारी अंकिसा येथे आठवडी बाजार भरतो. दोन ते तीन किमी अंतरावरून अनेक गावातील नागरिक विविध कामासाठी अंकिसा येथे येतात. मात्र वीज पुरवठ्याच्या लपंडावाने ग्रामपंचायत, शाळा, बँक आदी ठिकाणचे काम खोळंबत आहे. कर्मचाऱ्यांसह याचा त्रास विद्यार्थी व नागरिकांना होत आहे. मंगळवारी धानपिसाईसाठी आलेल्या शेतकºयाला राईसमिलवर विजेची प्रतीक्षा करावी लागली.