वसंतपूर ग्रामपंचायत कार्यालयात आयेजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बाेलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी मोर्चाचे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्निल वरघंटे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा भारतीय बंगाली उद्बोधन समितीचे अध्यक्ष दीपक हलधर, भाजप बंगाली आघाडीचे तालुका महामंत्री विधान वैद्य, बंगाली आघाडीचे माजी अध्यक्ष परिमल सरकार, वसंतपूरच्या सरपंच स्वास्ती राकेश सरकार, उपसरपंच मेनुका रॉय, कालीनगरचे सरपंच पवन मंडल व गावातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते वसंतपूरच्या सरपंच स्वास्ती राकेश सरकार, उपसरपंच मेनुका रॉय, ग्रामपंचायत सदस्य अमरी रतिकांत मंडल, श्रीराम हरेन बिश्वास, कालिनगरचे सरपंच पवन मंडल यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.