शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

बसफेऱ्या वाढल्यास एसटीला नफा

By admin | Published: May 30, 2017 12:45 AM

तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्लीपर्यंत दरदिवशी सुमारे २० बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.

पुलानंतर दळणवळण वाढले : तेलंगणा राज्य परिवहन मंडळ उचलत आहे फायदाप्रतीक मुधोळकर । लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्लीपर्यंत दरदिवशी सुमारे २० बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र महाराष्ट्र शासनाचा एसटी विभाग आवश्यकतेनुसार तेवढ्या बसफेऱ्या सोडण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे. सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर पूल झाल्यापासून तेलंगणा व सिरोंचा तालुक्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सिरोंचालगत कालेश्वर देवस्थान आहे. या देवस्थानाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भाविक जातात. त्यानुसार महाराष्ट्राच्या एसटी विभागाकडून कालेश्वरपर्यंत एक बस सोडण्यात येते. गडचिरोलीवरून सिरोंचा मार्गे एक बस तेलंगणा राज्यात जाते. तर अहेरी आगारातून बस चंद्रपूर मार्गे तेलंगणा राज्यात जाते. पूल झाल्याबरोबर दोन्ही राज्यांमध्ये नागरिकांचे आर्थिक व सामाजिक व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक तेलंगणा राज्यात व तेलंगणातील नागरिक महाराष्ट्रामध्ये ये-जा करतात. याचा पुरेपूर फायदा तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाने उचलण्यास सुरूवात केली आहे. तेलंगणा राज्यातील हैदराबाद, करीमनगर, मंचेरिअल, भूपालपल्ली, चेन्नूर, कालेश्वर, महादेवपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अहेरी उपविभागातील नागरिक नेहमीच ये-जा करतात. या शहरांमध्ये मोठी बाजारपेठ आहे व आरोग्य सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांचा ओढा तेलंगणा राज्याकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा उचलत तेलंगणा सरकारने सिरोंचा, आसरअल्लीपर्यंत दिवसातून सुमारे २० बसफेऱ्या सोडण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही बसफेऱ्या वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांकडून आहे. तेलंगणाच्या २० बसफेऱ्यागोदावरी नदीवर पूल झाल्याबरोबर वाढलेल्या आर्थिक व सामाजिक संबंधांचा फायदा तेलंगणा राज्याने उचलण्यास सुरूवात केली आहे. पुलाचे उद्घाटन झाल्याच्या अगदी काही दिवसातच तेलंगणा राज्याने बसफेरी सुरू केली. सद्य:स्थितीत दिवसाच्या २० बसफेऱ्या सिरोंचा तालुक्यात ये-जा करीत आहेत. त्या मानाने एसटीने बसफेऱ्या सुरू करण्याची गरज आहे.ेदुसऱ्या राज्यात २० किमी पेक्षा जास्त अंतरावर बससेवा सुरू करण्यासाठी मंत्रालयस्तरावरून परवानगी घ्यावी लागते. दोन्ही राज्यात करार होणे गरजेचे आहे. राज्याचे उपवाहतूक व्यवस्थापक हैदराबाद येथे जाणार आहेत. जुलै महिन्यापासून नागपूर-कालेश्वर, गडचिरोली-कालेश्वर बसफेरी सुरू होणार आहे. अहेरी-वरंगल, चेन्नूर, हैदराबाद, करीमनगर शहरांपर्यंत बससेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्याला तांत्रिक परवानगी मिळायची आहे. सध्या रेगुंठा-कालेश्वर बसफेरी सुरू आहे.- निलेश बेलसरे, विभागीय वाहतूक अधिकारी गडचिरोली