स्पेक्ट्रमचे उद्घाटन : शासकीय विज्ञान महाविद्यालयात कोकोडे यांचे प्रतिपादनंंगडचिरोली : युवकांमध्ये कौशल्य निर्माण करण्याची व ते विविध प्रकारच्या माध्यमातून आयोजित स्पर्धेतून इतरांना दाखविण्यासाठी शिबिर व कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. कौशल्यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असते. त्यामुळेच कुशल मनुष्यबळ आर्थिक शक्तीपेक्षा राष्ट्र विकासासाठी प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांनी केले. गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या स्पेक्ट्रम- २०१६ च्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कोकोडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयराम खोब्रागडे होते. यावेळी प्रा. डॉ. चुंगडे, प्रा. डॉ. वाघमारे, प्रा. कासर्ला, प्रा. कांबळे, प्रा. नासरे, प्रा. कोला, प्रा. देशमुख, प्रा. रायपुरे उपस्थित होते. दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, डिश डेकोरेशन, विज्ञान प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत अष्टपुत्रे, संचालन प्राची गणवीर तर आभार नरेश सोमनकर याने मानले.
कुशल मनुष्यबळानेच प्रगती
By admin | Published: January 07, 2016 2:08 AM