धानोरा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) उमेद व माविम यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम, पंचायत समिती सभापती अनुसया कोरेटी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे, जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, पंचायत समिती सदस्य महागू वाटगुरे, तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, मंडळ कृषी अधिकारी एल. एस. पाठक, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे, कृषी पर्यवेक्षक नीलकंठ बडवाईक, कृषी पर्यवेक्षक आनंद खेडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे, तर मंडळ कृषी अधिकारी एल. एस. पाठक यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तसेच माविमच्या सहयोगिनींनी सहकार्य केले.
बाॅक्स
५४ प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शनात
तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवात ५४ प्रकारच्या विविध रानभाज्या तालुक्यातील शेतकरी गट, महिला शेतकऱ्यांनी ठेवल्या होत्या. माविमच्या महिला बचत गटांनी रानभाज्यांपासून तयार केलेली विविध व्यंजने ही आकर्षणाचा विषय ठरली. प्रदर्शनातील रानभाज्यांचे निरीक्षण नागरिकांनी केले, तसेच खरेदीही केली.
120821\5709img-20210812-wa0052.jpg
धानोरा येथे राणभाजी महोत्सव डॉ होळी