जनजागृती प्रचार रथाला मुलचेराचे तहसीलदार शकपिल हटकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा अधिसूचित खरीप हंगामातील पिकांसाठी दाेन टक्के, नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी विहीत मुदतीपूर्वी नजीकच्या बँकेत अथवा आपले सरकार केंद्रावर जाऊन विमा भरावा, असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे. प्रधान मंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचे हिरवी झेंडी दाखविताना तालुका कृषी विकास अधिकारी विकास पाटील व कृषी अधिकारी सतीश निंभाळकर, मंडळ कृषी अधिकारी सोनाली सुतार, कृषी पर्यवेक्षक मनोहर दुधबवरे, वि. हरगुळे, उत्तम खंडारे, वाघमारे, राजेश गुंतीवार, आदी उपस्थित हाेते.
080721\img-20210708-wa0023.jpg
पीक विमा प्रचार