गडचिरोली : गडचिराेली-चामाेर्शी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान फुटलेल्या नळ पाईपलाईनची खा. अशाेक नेते यांनी पाहणी करून ही नळ पाईपलाईन तातडीने दुरूस्ती करावी, असे निर्देश संबंधित विभागाला दिले.
चामाेर्शी या राष्ट्रीय महामार्गाचे खाेदकाम सुरू करण्यात आले आहे. खाेदकामादरम्यान नगरपालिकेच्या नळ पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटल्याने या मार्गालगतच्या अनेक कुटुंबांचा नळ पाणीपुरवठा खंडित झाला आहे. ही समस्या माहीत हाेताच खा. अशाेक नेते यांनी २३ फेब्रुवारी राेजी प्रत्यक्ष मार्गावर जाऊन पाहणी केली.
यावेळी न. प. चे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपचे पदाधिकारी डाॅ. भारत खटी, न. प. पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, राष्ट्रीय महामार्गाचे उप कार्यकारी अभियंता आशिष आवळे, कंत्राटदार गायकवाड व इतर अधिकारी उपस्थित हाेते.
या मार्गाचे काम दर्जेदार व्हावे तसेच नळ पाणीपुरवठा व दूरध्वनी सेवेचे भूमिगत लाईन खंडित हाेऊ नये, अशाही सूचना खा. अशाेक नेते यांनी दिल्या.