शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

रबी पिकांचे अळींपासून संरक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:18 AM

रबी हंगामात हरभरा, तूर, कपासी आदी पिके महत्त्वपूर्ण मानले जातात. या पिकांवर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. या अळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याकरिता शेतकºयांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊन बंदोबस्त करावा,

ठळक मुद्देकीटकशास्त्र विभागाचे आवाहन : हरभरा, तूर व कपासीवर रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रबी हंगामात हरभरा, तूर, कपासी आदी पिके महत्त्वपूर्ण मानले जातात. या पिकांवर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. या अळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याकरिता शेतकºयांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊन बंदोबस्त करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या कीटकशास्त्र विभागाने केले आहे.हरभरा पिकाचे घाटेअळीपासून संरक्षण करण्याकरिता एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी केल्यास किडींचे कोष पक्षी वेचून खातात तसेच उन्हामुळे ते मरतात. गहू, मसूर, मोहरी, जवस आदी आंतर पीक घेतल्यास घाटेअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. तसेच शत्रू कीटकांचाही वापर केल्यास अळींचा बंदोबस्त करता येतो. तुरीवरील अळींचा बंदोबस्त करण्याकरिता प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे शेतात उभारावे, तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलविल्यास अळ्या खाली पडतात. कपासीमधील अंबाडीवर्गीय पर्यायी वनस्पतीचा नायनाट केल्यास रोगावर नियंत्रण आणता येतो.घाटेअळीपासून हरभºयाला धोकाहरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीची मादी हरभºयांच्या पानावर अंडी घालते. दोन ते तीन दिवसात अळी अंड्यातून बाहेर येते. त्यानंतर अळ्या हरभºयाचे आतील दाणे पोखरतात. एक अळी ३० ते ४० घाट्यांचे नुकसान करते. यावर पायबंद घालण्यासाठी पहिली फवारणी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अ‍ॅझॅडीरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मिली प्रती १० लीटर पाणी किंवा ५०० एलई व ५० ग्रॅम राणीपाल तसेच ब्युव्हेरिया बॅसियाना व जैवीक बुरशीनाशकाची ६० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.शेंगा पोखरणाºया अळींच्या प्रादुर्भावापासून तुरीचा असा करा बचावतूर पिकावर शेंगा पोखरणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. अशावेळी वेळीच उपययोजना करणे गरजेचे असते. तसेच पिसारी पतंग, शेंगे माशी आदी अळ्या व कीटकांचाही प्रादुर्भाव होतो. या तिन्ही अळ्यांवर एकच उपाय केला तरी रोग नायनाट होऊ शकतो. कळी अवस्थेत पहिली फवारणी निम कीटकनाशकाची (अ‍ॅझाडिरेक्टीन ३०० पीपीएम, ५० मिली/१० लिटर पाणी) करावी. तसेच क्निालफॉस २० टक्के प्रवाही २० मिली किंवा इथियॉन ५० टक्के प्रवाही २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.कपासीवर लाल ढेकणेबिटी कपासीवर लाल ढेकण्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. सुरुवातीच्या काळात उमलत्या बोंडांमधून ढेकणे रस शोषून घेतात. काही प्रमाणात बोंडे उमलत नाही. वाट झालेले बोंडे गळून पडतात. तसेच गर्द तपकिरी रंगाची होतात. त्यामुळे यावर पायबंद घालण्यासाठी फ्लूव्हॅलीनेट २५ टक्के प्रवाहीत ४ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी, फवारणी करण्यापूर्वी फुटलेले बोंड वेचून घ्यावे, तसेच झाडावरून दोर फिरवून समूहाने ढेकणे केरोसीनच्या पाण्यात सोडावे.