शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

जंगलालगतच्या पिकांचे संरक्षण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 11:50 PM

गावालगतच्या वनक्षेत्रात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष होतो. शेतपिकाचे नुकसान व मानवी जीवितहानीच्या घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजना गडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामापासून अंमलात आणण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोखंडी जाळीचे कुंपण योजना कार्यान्वित : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : गावालगतच्या वनक्षेत्रात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष होतो. शेतपिकाचे नुकसान व मानवी जीवितहानीच्या घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजना गडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामापासून अंमलात आणण्यात येणार आहे.याबाबत राज्याच्या महसूल व वनविभागाने २१ मार्च २०१८ रोजी नवा शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयान्वये आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलालगत शेत जमीन असलेल्या शेतकºयांना ९० टक्के अनुदानावर लोखंडी जाळी कुंपणासाठी मिळणार आहे. त्यादृष्टीने वन विभागाने या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही सुरू केली आहे.वनालगतच्या गावातील लोक जळाऊ लाकूड, शेती, घरगुती कामासाठी लागणार लहान लाकूड, जनावरांचे वैरण, रोजगार तसेच दैनंदिन गरजांसाठी वनावर अवलंबून आहेत. या निर्भरतेमुळे वनांचा दर्जा दिवसागणिक खालावत आहे. जंगलालगतच्या गावामध्ये मानव-वन्यप्राणी संघर्ष होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना कार्यान्वित केली आहे. सदर योजनेंतर्गत शेतकºयांना लोखंडी जाळीचे कुंपण उभारता येणार आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांपासून शेतजमिनीतील धान व इतर पिकांचे या जाळीच्या कुंपणामुळे संरक्षण होणार आहे.आरमोरी वन परिक्षेत्रासह जिल्ह्याच्या अनेक भागात जंगलालगतच्या शेतात दरवर्षी रानडुकर व इतर वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात धुडगुस असतो. शेकडो हेक्टरवरील धानपीक रानडुकर नासधूस करतात. त्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळते. रानडुकर व इतर वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यानंतरही शासन व प्रशासनाकडून संबंधित नुकसानग्रस्त शेतकºयाला नुकसान भरपाई मिळत नाही.आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे नुकसान झाल्याच्या तक्रारी वन विभागासह महसूल विभागाकडे अनेकदा केल्या. मात्र शेतकºयांना मदत मिळाली नाही.झुडपी जंगलावरील भार कमी होणारजंगलालगतच्या गावातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन कुंपण योजना यावर्षी प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे झुडपी व मोठ्या जंगलावरील शेतकºयांचा भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या झुडपी जंगलात तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठी आहे. शेतजमिनीतील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी अनेक शेतकरी झुडपी जंगलातील गराडीचे मोठमोठी झाडे तोडतात. गराडी झाडाचा जंगल बराच नष्ट झाला आहे. शिवाय लहान रोपटेही तोडण्यात आली आहे. शेतकºयांना ९० टक्के अनुदानावर लोखंडी जाळी कुंपणासाठी मिळणार असल्याने जंगलाचे सरंक्षण होणार आहे.ग्रामीण भागात गावकरी जळाऊ लाकूड, घरगुती तसेच शेतीकरिता जंगलतोड करून वनाची मोठी हानी करतात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. वृक्षतोडीमुळे वन्यजीव व जंगल संकटात सापडले आहेत. त्यामुळे आता वनावर अवलंबून असणारी निर्भरता कमी करून शेतकºयांनी शेत कुंपणासाठी आवश्यक त्या वनस्पतीचा वापर करावा.- व्ही. एम. गोडबोले,उपवनसंरक्षक, वन विभाग वडसा