देसाईगंज तालुक्यात यंदा तुरळक पाऊस झाला. सध्या धान पीक जाेेमात आहे; परंतु पंधरवड्यापासून पावसाने दांडी मारल्याने पीक करपण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत महावितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. कोंढाळा परिसरात अनेक मीटर बंद अवस्थेत आहेत तरीसुद्धा हजारो रुपयांचे वीजबिल पाठविले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी वीजबिल भरले, तरीसुद्धा भारनियमन केले जात आहे. पिकाला पाण्याची आवश्यकता असताना भारनियमन करून शेतकऱ्यांना जाेरदार फटका दिला जात आहे. पीक करपल्यानंतर वीज सुरळीत करणार काय, असा सवाल शेतकरी करीत आहेत. मागील वर्षी महापुराचा फटका शेतकऱ्यांना बसला तर या वर्षी भारनियमनाचा बसत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून २४ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:40 AM