ऑनलाईन लोकमतमार्र्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रा भरणार आहे. या यात्रेदरम्यान येथील भाविकांना मार्र्कंडेश्वर ट्रस्ट व प्रशासनातर्फे सुरू असलेल्या तयारीचा आढावा आ. डॉ. देवराव होळी यांनी घेतला. येथे येणाºया भाविकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवा, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.मार्र्कंडादेव येथील रामप्रसाद मराठा धर्मशाळा येथे विविध विभागांकडून यात्रेच्या तयारीबाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रामुख्याने चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, पोलीस उपनिरीक्षक रूपाली खोब्रागडे, मल्हार थोरात, संवर्ग विकास अधिकारी खामकर, एन. एम. माने, गजानन माने, भारतीय पुरातत्त्व विभागाचे संरक्षक पचिणे, मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यंूजय गायकवाड, नायब तहसीलदार बावणे, नंदूलवार, विस्तार अधिकार भोगे, ग्रामसेवक दिनेश सराटे, मार्कंडादेवच्या सरपंच उज्ज्वला गायकवाड, ग्रा. पं. सदस्य कीर्ति आत्राम, सुनिता मरस्कोल्हे यांच्यासह पंचायत समिती, एसटी महामंडळासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी स्थानिक व्यावसायिकांनी दुकानगाळ्याला कुलूप लावून आपल्या ताब्यात घ्यावे, आरक्षित केलेली मोकळी जागा ताब्यात घ्यावी, सुलभ शौचालय खुले करून त्यात पाण्याची व्यवस्था करून घ्यावी आदी बाबत या सभेत सूचना करण्यात आल्या. मार्र्कंडादेव यात्रेतील सोयीसुविधांबाबत यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली. सदर यात्रेदरम्यान शांतता बाळगून भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
भाविकांना सोयीसुविधा पुरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 1:38 AM
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रा भरणार आहे. या यात्रेदरम्यान येथील भाविकांना मार्र्कंडेश्वर ट्रस्ट व प्रशासनातर्फे सुरू असलेल्या तयारीचा आढावा आ. डॉ. देवराव होळी यांनी घेतला.
ठळक मुद्दे आमदारांच्या सूचना : मार्कंडादेव यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा