लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : क्रीडा क्षेत्राला वाव मिळण्यासाठी विविध क्रीडा साहित्यांसह क्रीडांगण अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त असणे गरजेचे आहे. गडचिरोली येथील जिल्हा स्टेडीयमचे आधुनिकीकरण व नुतनीकरण करण्यासाठी आपण आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.६ जानेवारी रोजी रात्री येथील जिल्हा स्टेडीयमवर सीएम चषक स्पर्धेचा समारोप बक्षीस वितरणाने करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर खा. अशोक नेते, आ. कृष्णा गजबे, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, माजी जि.प.अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, बाबुराव कोहळे, चंद्रपूर जि.प.चे समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, चंद्रपूर मनपाचे स्थायी समिती सभापती राहूल पावडे, रामू तिवारी, स्वप्नील वरघंटे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील युवक एकलव्यासारखे आहेत.प्रचंड जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर यश कवेत घेण्याची शक्ती त्यांच्यात आहे. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठीही आपण प्रयत्नशील असून ९० कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती त्यांनी दिली.गडचिरोली-वडसा रेल्वे मार्गासंदर्भात वनविभागाच्या जागेचा प्रश्न आपण सोडविला आहे. गडचिरोली नगर परिषद क्षेत्रातील विकासकामांसाठी ३५ कोटी रूपयांचा निधी दिला असून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सुध्दा विशेष बाब म्हणून ४४ कोटी रूपयांचा विकास निधी उपलब्ध केला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आपण वचनबध्द असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी खा.अशोक नेते म्हणाले, सतत विकासाचा ध्यास उराशी बाळगणारे अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्यासारखे नेते सोबत असताना गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. सीएम चषक स्पर्धांमधील विजेत्यांना यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन भाजयुमोचे गडचिरोली शहर अध्यक्ष तथा सीएम चषक स्पर्धेचे संयोजक अनिल तिडके यांनी केले.
जिल्हा स्टेडियमच्या आधुनिकीकरणासाठी निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 10:32 PM
क्रीडा क्षेत्राला वाव मिळण्यासाठी विविध क्रीडा साहित्यांसह क्रीडांगण अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त असणे गरजेचे आहे. गडचिरोली येथील जिल्हा स्टेडीयमचे आधुनिकीकरण व नुतनीकरण करण्यासाठी आपण आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही : सीएम चषक स्पर्धेचा बक्षीस वितरणाने समारोप