लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत रेगुलवाही अंतर्गत येणाऱ्या मोतकुपली येथे सिलिंडरचा स्फोट होऊन भिषण आग लागल्याने चार घरे जळून खाक झाल्याची घटना २७ मे रोजी रविवारला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच खा. अशोक नेते यांनी अहेरीच्या तहसीलदारांना आगग्रस्त घराचा पंचनामा तत्काळ करून शासनस्तरावर अहवाल सादर करावा. संबंधित आगग्रस्त कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, असे निर्देश दिले.घटनास्थळावर अग्निशमन वाहन पोहोचू न शकल्याने गावातील लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यान आग आटोक्यात आली नाही. या घटनेत घरातील कपडे, धान, दागिणे व इतर साहित्य जळून पूर्णत: खाक झाले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने चारही घरातील कुटुंबीय बाहेर अंगणात झोपले होते. त्यामुळे जीवितहानी घडली नाही. गावातील नागरिकांनी एकत्र येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. सदर आगीच्या घटनेत पोचा कुळमेथे यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले. त्यांचे १ लाख २८ हजार ७०० रूपयांचे नुकसान झाले. तिरूपती पोचा कुळमेथे यांचे १ लाख ३० हजार २०० रूपयांचे नुकसान झाले. पोचा हनुमंतूू कुळमेथे यांचे १ लाख ९७ हजार ३०० रूपये तर जग्गा हनुमंतू कुळमेथे यांचे २ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती मोका पंचनामा करणारे तलाठी एल.एस. पेंदाम यांनी दिली आहे.सिलिंडरच्या स्फोटामुळे चार घरे जळून खाक झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना मिळाली. त्यांनी जि.प. सदस्य अजय नैताम, पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, पं.स. सदस्य भास्कर तलांडे, खांदलाच्या सरपंच शकुंतला कुळमेथे, सामाजिक कार्यकर्ते बबलू शेख, माधव कुळमेथे, दिवाकर आलाम यांनी घटनास्थळी पोहोचून नुकसानीची पाहणी केली.यावेळी आर्थिक मदत देण्यात आली. शासनाकडून योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन जि.प. सदस्य नैताम यांनी दिले. तप्त उन्हाळा असल्याने जिल्ह्याच्या विविध भागात आगीच्या घटना सध्या घडत आहेत.
मोतकुपलीच्या आगग्रस्त कुटुंबीयांना तत्काळ मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:03 PM
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत रेगुलवाही अंतर्गत येणाऱ्या मोतकुपली येथे सिलिंडरचा स्फोट होऊन भिषण आग लागल्याने चार घरे जळून खाक झाल्याची घटना २७ मे रोजी रविवारला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच खा. अशोक नेते यांनी अहेरीच्या तहसीलदारांना आगग्रस्त घराचा पंचनामा तत्काळ करून शासनस्तरावर अहवाल सादर करावा. संबंधित आगग्रस्त कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, असे निर्देश दिले.
ठळक मुद्देखासदारांचे निर्देश : जीवितहानी टळली; साहित्यांचे नुकसान