काेराेनाविरद्ध काम करणाऱ्या काेराेनायाेद्ध्यांना शासनाने ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू केले आहे. काेराेना प्रतिबंधात्मक लढाईत शिक्षकही सहभागी झाले आहेत. गावातील कुटुंबांचे संरक्षण करणे, चेक पाेस्टवर काम करणे, लसीकरण केंद्रावर लसीकरण नाेंदीचे काम, रेशन दुकानावर रेशन वाटपासाठी मदत करणे आदी कामांसाठी शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. मात्र काेराेनायाेद्ध्यांच्या यादीत शिक्षकांचा समावेश नाही. त्यामुळे काम करताना काेराेनाची बाधा हाेऊन मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबांना काेणताही लाभ देण्यात आला नाही. हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे. शिक्षकांनाही काेराेनायाेद्धा म्हणून घाेषित करावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर, विभागीय सचिव सुरेश डांगे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख, जिल्हा सचिव आर.एस. बिट्टीवार, कार्याध्यक्ष अमरदीप भुरले, रवींद्र गावंडे, रघुपती मुरमाडे, गुरुदास सोमनकर, हेमंत दुर्गे, संजय मेश्राम, यमाजी मुजमकर, सरंजामी जोडे, खुशाल भुरसे, मारोती देवतळे, अरुणा कुळमेथे, बेबीनंदा सहारे, भगवान मडावी यांनी केली आहे.
शिक्षकांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:36 AM