लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील महिला व मुलांमधील रक्ताक्षयाचे (अॅनिमिया) प्रमाण कमी करण्यासाठी पोषकद्रव्य जास्त प्रमाणात असलेल्या फोर्टिफाईड या प्रक्रिया केलेल्या तांदळाचा पुरवठा प्रायोगिक तत्वावर कुरखेडा व भामरागड या तालुक्यात होणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत टाटा ट्रस्टच्या सहाय्याने सदर तांदूळ वितरित होणार आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.यासंदर्भात राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने १ जून २०१८ रोजी नवा शासन निर्णय निर्गमित केला आहे. आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून ती राज्य शासनाद्वारे राबविली जाते. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्यात २०१६-१७ च्या हंगामापासून विकेंद्रीत धान खरेदी योजना राबविण्यात येते. या योजनेतून खरेदी केलेला धान, ज्वारी, बाजरी व मक्का लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्त भाव दुकानाद्वारे वितरित केला जातोे.देशात व राज्यात अॅनिमियाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. सन २०१५-१६ च्या चौथ्या राष्टÑीय आरोग्य सर्वेक्षणानुसार महाराष्टÑातील सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातील ५३.८ टक्के मुलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. १० ते १८ वर्ष वयोगटातील मुलींमध्ये ३८ टक्के व गर्भधारक महिलांमध्ये ५६ टक्के इतक्या प्रमाणात अॅनिमिया असल्याचे दिसून आले. अॅनिमिया हा आजार रोजच्या जेवणातील जीवनसत्वे, जी-१२ व पोषकद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येतो. पुरेशा प्रमाणात जेवणातून लोह व इतर पोषकद्रव्य दिल्यास अॅनिमिया मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणता येतो. सद्य:स्थितीत लोहयुक्त गोळ्या देणे ही उपाययोजना सरकारमार्फत अॅनिमिया नियंत्रणाबाबत सुरू आहे. सदर उपाययोजनेला पुरक ठरतील अशा उपाययोजना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासाठी या फोर्टिफाईड तांदळाचा पर्याय समोर आला आहे. अशा प्रकारच्या उपाययोजना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या अन्नधान्यासोबत करण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टद्वारे शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार तांदूळ फोर्टिफाईड करण्याचा प्रकल्प टाटा ट्रस्टच्या सहकार्याने भामरागड व कुरखेडा तालुक्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हाधिकारी, टाटा ट्रस्टच्या निर्णयातून मिलरची निवड होणारफोर्टिफाईड तांदूळ वितरित करण्याबाबतचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर भामरागड व कुरखेडा तालुक्यात सुरू झाल्याच्या तारखेपासून बारा महिन्यांसाठी राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर असल्याने धान भरडाईच्या प्रक्रियेदरम्यान तांदूळ फोर्टिफाईड करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या कोणत्याही एका मिलरची निवड टाटा ट्रस्ट, जिल्हाधिकारी व राज्य शासनाच्या संयुक्त निर्णयातून करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी व टाटा ट्रस्टमध्ये करारनामा होणार असून या प्रकल्पाची कार्यवाही अटी, शर्तीनुसार करण्यात येणार आहे.
महिला व मुलांसाठी पोषक ‘फोर्टिफाईड’ तांदूळ देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:18 AM
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील महिला व मुलांमधील रक्ताक्षयाचे (अॅनिमिया) प्रमाण कमी करण्यासाठी पोषकद्रव्य जास्त प्रमाणात असलेल्या फोर्टिफाईड या प्रक्रिया केलेल्या तांदळाचा पुरवठा प्रायोगिक तत्वावर कुरखेडा व भामरागड या तालुक्यात होणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत टाटा ट्रस्टच्या सहाय्याने सदर तांदूळ वितरित होणार आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.यासंदर्भात ...
ठळक मुद्देरक्ताक्षयावर मात : कुरखेडा व भामरागड तालुक्यांत प्रयोग