पालकमंत्र्यांना निवेदन : हेल्थ वर्कर असिस्टंट संघटनेची मागणीसिरोंचा : आरोग्य विभागातील आरोग्यसेवकाची रिक्तपदे भरताना ५० टक्के आरक्षण देऊन सेवेत सामावून घ्यावे, याकरिता शासनाकडे पाठपुराव्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी हेल्थ वर्कर असिस्टंट संघटना सिरोंचा यांच्या वतीने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील बेरोजगारांनी महाराष्ट्र व्यवसाय परीक्षा मंडळ मुंबई अंतर्गत हेल्थ वर्कर असिस्टंट पदाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. एचडब्ल्यूएचा अभ्यासक्रम एमपीडब्ल्यू अभ्यासक्रम समकक्ष आहे. मात्र एचडब्ल्यूए अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना रोजगार मिळालेला नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना माधव कासर्लावार, मनीष कासर्लावार, शकील शेख, विजय बोंगोनी, समय्या बुरम, मो. याकुबबाबा शेख, श्यामकुमार रमेश जक्कूला, सागर देवोजीवार उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
आरोग्यसेवक पदभरतीत स्थान द्या
By admin | Published: February 09, 2016 1:12 AM