गुड्डीगुडम परिसरात समस्या : उपकार्यकारी अभियंत्यांना नागरिकांचे निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क गुड्डीगुडम : गुड्डीगुडम गावासह परिसरात मागील दोन महिन्यांपासून अनियमित वीज पुरवठा होत असल्याने या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात नियमित वीज पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांच्यावतीने महावितरणच्या आलापल्ली कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गुड्डीगुडम परिसरात दिवसातून केवळ दोन ते तीनच तास वीज पुरवठा केला जात आहे. मागील दोन महिन्यांपासून रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा नियमित होत नाही. मागील पाच दिवसांपासून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. गावालगतच्या शेतांमध्ये वीज खांब कोलमडून पडले आहेत. तर काही ठिकाणी बांबूवरून वीज तारांमार्फत पुरवठा केला जात आहे. परिसरातील वीज समस्येविषयी लाईनमनला भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाही. नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. निवेदन देताना तिमरमचे सरपंच महेंद्राबापू मडावी, नागेश सिर्लावार, रवी मडावी, उमेश पेंड्याला, संतोष गणपूरवार, इलियास शेख, राकेश सडमेक, सतीश आत्राम, देशू सडमेक, शेंद्रशाह सडमेक, राकेश सोयाम, रमेश बामनकर, सचिन गणपूरवार, श्रीनिवास पातावार, तुळशीराम ओनपाकला उपस्थित होते.
नियमित वीज पुरवठा करा
By admin | Published: June 25, 2017 1:34 AM