शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

शेडनेट हाऊस शेतीसाठी प्रशिक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:41 AM

कमी उंचीच्या पुलामुळे अडते वाहतूक चामाेर्शी : तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या घारगावजवळील नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. हरणघाट, घारगाव, ...

कमी उंचीच्या पुलामुळे अडते वाहतूक

चामाेर्शी : तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या घारगावजवळील नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. हरणघाट, घारगाव, रामाळा, फराडा व मार्कंडादेव या परिसरातील नागरिक या मार्गाने प्रवास करतात. पुलावर संरक्षक भिंत नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत राहते. अशाही स्थितीत नागरिक या पुलावरून प्रवास करतात. संरक्षक भिंत नसल्याने वाहन सरळ नाल्यात काेसळण्याचा धाेका आहे.

चामोर्शीतील नवीन वस्ती बनली समस्यांग्रस्त

चामोर्शी : शहरातील गणेशनगर, हनुमाननगर, आष्टीकडे जाणारा मार्ग वस्ती, ऑफिसर कॉलनी, मूल मार्गाच्या उजव्या बाजूची वस्ती साधूबाबानगर आदी वस्त्यांमध्ये गेल्या १० वर्षांपासून लोकसंख्या वाढली आहे. परंतु त्या वस्तीत मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. पक्के रस्ते, नाली व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा अभाव आहे. नालीअभावी सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे.

भ्रमणध्वनी सेवा वारंवार विस्कळीत

सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे, परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त बनले आहेत. अंकिसा परिसरात लक्ष्मीदेवी पेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्लीश आदी गावे येतात, परंतु मागील एक महिन्यापासून येथील बीएसएनएल सेवा विस्कळीत होत आहे. विद्युत पुरवठाही खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत.

लाेहा गावाला विजेची प्रतीक्षा

झिंगानूर : लोहा गावाचा समावेश अहेरी तालुक्यात आहे, तर येडसिली गाव सिरोंचा तालुक्यात येते. दोन्ही गावे झिंगानूर परिसरात आहेत. परंतु या गावांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव आहे. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही गावाच्या विकासाला गती मिळाली नाही. लोहा गावात १०० टक्के आदिवासी समाज आहे, परंतु येथे अद्यापही वीज पोहोचली नाही.

येवली येथे जलद बसला थांबा द्या

गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बसला थांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्यांव्यतिरिक्त इतर आगारांच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलावी लागत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी येथे जलद बसला थांबा देण्याची मागणी होत आहे.

लोंबकळणाऱ्या तारांमुळे वाढला धोका

धानोरा : शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इतरही वॉर्डांमध्ये विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी महावितरणकडे तक्रारही केली आहे. मात्र, महावितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

कलेक्टर कॉलनीत सांडपाण्याची दुर्गंधी

गडचिरोली : शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत समजल्या जाणाऱ्या कॉम्प्लेक्स परिसरातील कलेक्टर कॉलनीतील ड्रेनेज लाईन फुटली आहे. त्यामुळे सांडपाण्याची दुर्गंधी येत आहे. सातत्याने मागणी करूनही पालिका प्रशासनाचे समस्यांकडे दुर्लक्ष आहे.

आलापल्ली येथे गतिरोधक निर्माण करा

आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक तयार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचेही आवागमन असते.

सीमावर्ती भागात गुटखा विक्री वाढली

एटापल्ली : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यांतून अवैध गुटखा विक्रीस आणला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.