लाेमेश बुरांडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
चामाेर्शी (गडचिरोली) : काेराेना विषाणूच्या संसर्गाने नाती दुरावली, कुटुंब दुभंगले, आप्तेष्टांना हिरावले. एवढेच नव्हे तर आजाराबाबत समाजात भीती निर्माण केली. यातून सुदैवाने काहीजण बचावले, तर काहींनी जगाचा निराेप घेतला. अनेक कुटुंबांना काेराेनाने दु:खाचा जबरदस्त हादरा दिला. असाच प्रसंग चामाेर्शी तालुक्यातील मुधाेली रिठ गावातील मूळ रहिवासी असलेल्या वनकर कुटुंबावर ओढवला. काेराेनाग्रस्त असलेल्या पाेेलीस उपनिरीक्षक पतीच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांतच पत्नीनेही जगाचा निराेप घेतला.
पाेलीस उपनिरीक्षक विजय वनकर (५६) व शीला वनकर (५४) असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. वनकर हे मूळचे चामाेर्शी तालुक्यातील मुधाेली रिठ येथील राहिवासी हाेते. त्यांना तरुण वयापासूनच पाेलीस दलाविषयी आकर्षण हाेते. गावातीलच शीला देवतळे यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. विवाहानंतर ते पाेेलीस दलात रुजू झाले. मागील वर्षीपासून काेराेना विषाणूचा संसर्ग वाढल्याने इतर पाेलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्यावर जावे लागत हाेते.
सध्या गडचिरोलीत नियमित कर्तव्य बजावत असतानाच त्यांना काेराेनाची लागण झाली. काेराेना चाचणी झाल्यानंतर विजय व शीला हे दाेघेही एकाचवेळी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाले. सुरुवातीचे तीन-चार दिवस दाेघांचीही प्रकृती उत्तम हाेती. परंतु नंतर मात्र प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली. डाॅक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु काेराेना याेद्धा असलेले विजय वनकर काेराेनावर ‘विजय’ मिळवू शकले नाही आणि १९ मे २०२१ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी काेराेना याेद्धांच्या पुढे होऊन आपले कर्तव्य पार पाडावे लागत असताना काहींना स्वत:च्या व कुटुंबाच्या बलिदानातून त्याची जबर किंमत चुकवावी लागत आहे.
(बॉक्स)
‘साथ जियेंगे साथ मरेंगे’
तीन दशकांपूर्वी प्रेमविवाह करून ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’चे घेतलेले वचन या दाम्पत्याने अखेरपर्यंत निभावले. पती विजय यांचे निधन झाल्याने पत्नी शीला अस्वस्थ झाल्या. पतीच्या ओढीने अगदी तिसऱ्याच दिवशी म्हणजे २२ मे रोजी त्यांनीही जगाचा निराेप घेतला. पती-पत्नीचे असे आकस्मिक जाणे कुटुंबीयांसाठीच नाही तर समस्त गावकऱ्यांसाठी चटका लावून गेले. विजय वनकर यांच्या पश्चात दाेन मुले, मुलगी, नात व साळे एटापल्लीचे गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे असा आप्त परिवार आहे.
बाॅक्स....
काेविड कंट्राेल रूममध्ये हाेते कार्यरत
विजय वनकर हे पाेेलीस मुख्यालयातील काेविड कंट्राेल रूममध्ये कार्यरत हाेते. त्यामुळे सध्या ते गडचिराेली येथील गाेकुलनगरात वास्तव्यास हाेते. तेथूनच ते कर्तव्य बजावत हाेते. नियमित कर्तव्यावर जात असताना त्यांना काेराेनाने विळखा घातला. केवळ त्यांनाच नाही, तर अजाणतेपणेे संपूर्ण कुटुंबाला काेराेनाने विळखा घातला. यातून कुटुंबातील इतर सदस्य सावरले असले तरी पती-पत्नीने मात्र एकमेकांची साथ सोडली नाही.
===Photopath===
290521\29gad_1_29052021_30.jpg~290521\29gad_2_29052021_30.jpg
===Caption===
29gdph12.jpg, 29gdph13.jpg~29gdph12.jpg, 29gdph13.jpg