आॅनलाईन लोकमतगडचिरोली : कुष्ठरोग निर्मुलनासाठी सुरू केलेल्या ‘स्पर्श’ कुष्ठरोग जाणीव जागृती अभियानात अधिकाधिक जणांचा सहभाग मिळविण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेने करावा आणि जिल्ह्यात व्यापक स्तरावर नागरिक स्वयंस्फूर्तीने तपासणीस येतील यासाठी जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.२६ जानेवारी २०१८ पासून हे अभियान सर्वत्र राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी सिंह यांनी सोमवार घेतला. दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा होतो. तसेच ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोग निवारण पंधरवडा घेण्यात येतो, बाराव्या पंचवार्षिक योजनेत कुष्ठरोगाचे प्रमाण कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे. तसेच या कार्यक्रमाचा समावेश प्रधानमत्र्यांच्या प्रगती योजनेतही करण्यात आला आहे.बैठकीदरम्यान कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. अमित साळवे यांनी माहिती सादर केली. या बैठकीला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. वानखेडे, साथरोग अधिकारी डॉ. म्हशाखेत्री, आशा समन्वयक सोनाली जोगदंड तसेच एन. एस. पराते आदींची उपस्थिती होती. जनजागृतीसाठी पथनाट्य, निबंध स्पर्धा तसेच विविध माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. याचा सविस्तर आराखडा दोन दिवसात सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी या बैठकीत दिले.२६ जानेवारी रोजी राज्यात सर्वच ठिकाणी ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. या ग्रामसभांमध्ये कुष्ठरोगविषयक प्रतिज्ञेचे वाचन होणार आहे. त्यामुळे कुष्ठरोग पंधरवाड्याविषयी नागरिकांना माहिती मिळणार आहे.या पंधरवड्याच्या कालावधीत शासकीय आरोग्य यंत्रणेसोबत अंगणवाडी तसेच खाजगी व्यवसाय करणारे डॉक्टर यांची मदत घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचण्यासाठी गावांमधील वैदू, तसेच पुजारी आदींचीही मदत घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी बैठकीत दिल्या.
कुष्ठरोगाबाबत जनजागृती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:11 PM
कुष्ठरोग निर्मुलनासाठी सुरू केलेल्या ‘स्पर्श’ कुष्ठरोग जाणीव जागृती अभियानात अधिकाधिक जणांचा सहभाग मिळविण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेने करावा....
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : २६ पासून जागृती अभियान