लाभ घेण्याचे आवाहन : भाजपची कार्यविस्तार योजनालोकमत न्यूज नेटवर्कठाणेगाव : केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या हेतूने व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव (भु.) व नवीन डोंगरगाव येथे शासकीय योजनांची जनजागृती भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली.डोंगरगाव येथील बसथांब्यावर कार्यक्रम घेऊन पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे विचार, कार्य, पक्षाचे विचार, केंद्र शासनाच्या तीन वर्षात राबविलेल्या विविध योजनांची माहिती गावात फिरून देण्यात आली. यामध्ये शासनाच्या कृषीविषयक योजना, मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळे, शेतकरी पीक विमा, जनधन योजना, शौचालय बक्षीस योजना, प्रधानमंत्री घरकूल योजना आदींबाबत माहिती देण्यात आली. अल्पसंख्यंक समाजाला योजनांची माहिती व्हावी म्हणून त्यांच्याही गृहभेटी घेण्यात आल्या. त्यानंतर पक्षाचा ध्वज फडकवून जुन्या बुथ समितीत बदल करण्यात आले. डोंगरगाव बसथांब्यावरील कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा महामंत्री गोपाल भांडेकर, दीपक बैस, उपसरपंच लालाजी कुकडकर, राहुल फुलबांधे, नक्टू राऊत, ईश्वर गोलकोंडावार, नरेश कुथे, विठ्ठल धोटे, श्रीहरी नारदेलवार, औंकार डांगी, हरजित डांगी, भागसिंग डांगी, हरिदास बुल्ले, रेखा गोलकोंडावार, माया ठाकरे, मिरकौर डांगी, पूनम डांगी, रेशमकौर डांगी, डोंगरगावातील कार्यक्रमाला सदानंद कुथे, नानाजी राऊत, संतोष सामृतवार, सुधाकर सामृतवार, सचिन कुथे, बुधाजी सामृतवार, नामदेव कोल्हे, विनोद कोल्हे, राजू कुतरमारे, श्यामदेव कोल्हे, लोचन ढोरे, सुशिला कुथे, सविता सामृतवार, ज्ञानेश्वरी राऊत, उषा सामृतवार, मंजूषा कुथे, महेश कोल्हे, सुनील सामृतवार व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
डोंगरगावात कार्यकर्त्यांकडून शासकीय योजनांची जनजागृती
By admin | Published: June 09, 2017 1:07 AM