काेराेना विषाणू फुप्फुसांवर परिणाम करीत असल्याने गंभीर स्वरूपाच्या रुग्णाला ऑक्सिनची, तर कधीकधी व्हेंटिलेटर लावावा लागतो. हा खर्च लाखाेंच्या घरात राहत असल्याने सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्याच्या बाहेर आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने काेराेना राेगाचा समावेश जनआराेग्य याेजनेत करून घेतला. अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत गडचिराेली जिल्ह्यात २७ हजार ४७९ रुग्णांना काेराेनाची बाधा झाली आहे. त्यातील किमान १० टक्के म्हणजेच जवळपास तीन हजार रुग्ण गंभीर हाेते. या सर्वांचा जनआराेग्य याेजनेंतर्गत उपचार हाेणे आवश्यक हाेते. मात्र, केवळ ५१२ रुग्णांनाच या याेजनेचा लाभ घेतला आहे. लाभ घेतलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयातील ४८२, उपजिल्हा रुग्णालय आरमाेरीतील २० व उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथील १० जणांनी या याेजनेचा लाभ घेतला आहे.
बाॅक्स
लाभ न घेताही माेफत उपचार हाेत असल्याने दुर्लक्ष
- कुरखेडा, अहेरी, आरमाेरी ही उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा सामान्य रुग्णालय व गडचिराेली येथील दाेन खासगी रुग्णालये अशी एकूण सहा रुग्णालये जनआराेग्य याेजनेंतर्गत जाेडली आहेत. शासकीय रुग्णालयांमध्येच काेराेनाचे उपचार केले जात आहेत. त्यामुळे जनआराेग्य याेजनेचा लाभ न घेताही रुग्णांवर माेफतच उपचार हाेत आहेत. त्यामुळे जनआराेग्य याेजनेंतर्गत लाभ घेतला किंवा नाही याचा रुग्णाला काहीच फरक पडत नाही. परिणामी या याेजनेसाठी नाेंदणी करण्याकडे रुग्णांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते.
- याेजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड व आधार कार्ड हे दाेन दस्तावेज आवश्यक आहेत. मात्र, प्रतिनिधींनी वेळाेवेळी विचारणा करूनही तेही कागदपत्रे आणून देत नव्हते. तसेच काही रुग्ण एकटेच भरती राहत असल्याने त्यांच्याकडून कागदपत्रे उपलब्ध हाेत नव्हती.
बाॅक्स
अशी करता येते नाेंदणी
प्रत्येक रुग्णालयात आराेग्य मित्र नेमण्यात आले आहेत. हे आराेग्य मित्र काेणती कागदपत्रे आवश्यक आहेत. याची माहिती रुग्णाच्या नातेवाइकाला देतात. तेच संपूर्ण माहिती ऑनलाईन भरून देतात.
बाॅक्स
शासकीय रुग्णालयांचे नुकसान
जनआराेग्य याेजनेत सरकारने एका खासगी कंपनीसाेबत करार केला आहे. यात नाेंदणी केलेल्या रुग्णाच्या उपचारांचे पैसे संबंधित कंपनी रुग्णालयाला देते. शासकीय रुग्णालयांनी रुग्णांवर माेफतच उपचार केला आहे. या रुग्णांची महात्मा फुले जनआराेग्य याेजनेंतर्गत नाेंदणी करवून घेतली असती तर प्रत्येक रुग्णामागे रुग्णालयाला काही पैसेे मिळाले असते. यातून रुग्णालयात आराेग्य सुविधा निर्माण करता आल्या असत्या. रुग्णांची नाेंदणी न झाल्याने शेवटी शासकीय रुग्णालयांचेच पैसे वाचले आहेत.
आलेख
याेजनेशी जाेडलेली रुग्णालये - ६
एकूण काेराेनाबाधित - २७,४७९
एकूण काेराेनामुक्त - २४,४५३
आतापर्यंत झालेले मृत्यू - ६३०
उपचार सुरू असलेले रुग्ण - २,३९६
याेजनेचा लाभ घेतलेले रुग्ण - ५०२