शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

तासाभरात गुंडाळली जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:44 AM

महाराष्टÑात आणि तेलंगणाच्या सीमेवरून वाहणाºया गोदावरी नदीच्या विस्तीर्ण पात्रावर तयार होत असलेल्या मेडीगड्डा सिंचन प्रकल्पासाठी तेलंगणा ....

ठळक मुद्देमेडीगड्डा प्रकल्प : औपचारिकता पूर्ण करून अधिकाºयांनी घेतला काढता पाय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/सिरोंचा : महाराष्टÑात आणि तेलंगणाच्या सीमेवरून वाहणाºया गोदावरी नदीच्या विस्तीर्ण पात्रावर तयार होत असलेल्या मेडीगड्डा सिंचन प्रकल्पासाठी तेलंगणा आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी जनसुनावणी झाली. परंतू आधीच सर्व प्रक्रिया पूर्ण केली असल्याने ही जनसुनावणीची औपचारिकता अधिकारीवर्गाने अवघ्या एक तासात गुंडाळून काढता पाय घेतला. त्यामुळे अनेक पदाधिकाºयांसह प्रकल्पाला विरोध करणाºयांनी संताप व्यक्त केला.या प्रकल्पासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना बाधित व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन प्रकल्पाची योग्य माहिती देण्यासोबतच प्रकल्पग्रस्तांना मिळणाºया मोबदल्याची स्पष्ट माहिती देणे गरजेचे होते. मात्र आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आणि विविध परवानग्या घेण्याआधीच प्रकल्पाचे काम सुरू झाले. पण आम्ही जनसुनावणी घेतली हे रेकॉर्डवर दाखविण्यासाठी बुधवारी पोचमपल्ली येथे दुपारी २ वाजता जनसुनावणी ठेवली होती. मात्र आजुबाजूच्या परिसरातील बहुतांश गावकºयांना या जनसुनावणीची माहितीच नव्हती. गावांत दवंडी देऊन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून याबाबतची माहिती देण्यात आली नसल्याचे गावकºयांनी सांगितले.माहितीअभावी या जनसुनावणीला मोजकेच लोक उपस्थित होऊ शकले. काही जागरूक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. पण मेडीगड्डा प्रकल्पाचे अधिकारी, तेलंगणा सिंचन विभागाचे आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या अधिकाºयांपैकी कोणीही त्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. यावेळी गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, प्रादेशिक प्रदुषण महामंडळाच्या संचालिका देशपांडे, अहेरीचे उपविभागीय अधिकारी चोरमारे, सिरोंचाचे तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार, मेडिगड्डा प्रकल्पाची जबाबदारी असणारे तेलंगणा सिंचन विभागाचे मुख्य अभियंता व्यंकटेश्वरलू आदी उपस्थित होते. या प्रकल्पाच्या उभारणीवरून सिरोंचा तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठा रोष असल्यामुळे जनसुनावणीची प्रक्रिया फारशी प्रसिद्धी न करता आटोपती घेण्यात आली. नागरिकांचा रोष उफाळल्यास परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही लावला होता. विशेष म्हणजे नागरिकांचे आधार कार्ड बघून जनसुनावणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जात होता.तेलंगणा सरकारची दडपशाहीया सुनावणीदरम्यान मेडीगड्डा प्रकल्प विरोधी समितीचे मधुसूदन आरवेली, सिरोंचा पं.स.चे उपसभापती त्रिकुला कृष्णमूर्ती व इतर अनेक लोकांनी मते मांडली. वनविभागासह इतर अनेक परवानग्या न घेता जे बांधकाम सुरू आहे त्यावर त्यांनी आक्षेप नोंदविला.जिल्हा प्रशासनाकडे या प्रकल्पासंबंधी कुठलीही माहिती मागितली तर देत नाही. भूसंपादन न करता एल अ‍ॅन्ड टी कंपनीकडून थेट जमिनी ताब्यात घेऊन काम केल्या जात आहे. तेलंगणा सरकारची ही दडपशाही सुरू आहे, असा आरोप पदाधिकाºयांनी केला.आरडाचे उपसरपंच रंगुबापू यांनीही प्रकल्पाची भिती नागरिकांमध्ये असून त्याचे निराकरण करावे अशी मागणी केली. प्रदुषण महामंडळाच्या देशपांडे यांनी सर्व आक्षेप केंद्र सरकारकडे पाठविले जाईल, असे सांगून कोणत्याही प्रश्नाचे थेट उत्तर न देता सर्वांची बोळवण केली.पालकमंत्र्यांनी फिरविली पाठया मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले पालकमंत्री अंबरिशराव आत्राम हे बुधवारी जनसुनावणी असलेल्या पोचमपल्ली या गावापासून अवघ्या ३ किमी अंतरावर अमडेली गावातील कार्यक्रमात गेले होते, पण जनसुनावणीच्या ठिकाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्यावरही रोष व्यक्त केला. विशेष म्हणजे यापूर्वी पालकमंत्री आत्राम यांनी पोचमपल्लीत जाऊन गावकºयांचे नुकसान होऊ देणार नाही असे म्हटले होते. मग आज त्यांनी पाठ का फिरविली? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.आविसंच्या पदाधिकाºयांचा आक्षेपआदिवासी विद्यार्थी संघाचे दीपक आत्राम, जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार हे जनसुनावणीच्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी अधिकारी परतीच्या प्रवासाला निघत होते. प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकारी देशपांडे यांना थांबवून त्यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण कोणतेही उत्तर न देता त्या निघून गेल्या. त्यामुळे आविसंच्या पदाधिकाºयांनी जनसुनावणीच्या पद्धतीवरच आक्षेप घेतला. त्यांनी पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्याविरूद्ध घोषणाबाजी केली.