लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले असून या निष्क्रीयतेबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जनताच या निष्क्रीय सरकारला धडा शिकविणार, असा विश्वास युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी व्यक्त केला.गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक विश्रामगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कुणाल राऊत यांनी युवक काँग्रेसतर्फे गडचिरोल जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या चलो पंचायत अभियानचा कामाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील नवीन कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांशी संघटनेबाबत चर्चा केली. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांची फळी निर्माण झाली पाहिजे, असे राऊत यांनी सांगितले.या प्रसंगी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी पंकज गुड्डेवार, युकाँचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, विश्वजित कोवासे, केतन रेवतकर, अजित सिंग, नंदू वाईलकर, अमोल भडांगे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष अधिर इंगोले, रजनिकांत मोटघरे आदी उपस्थित होते. बैठकीसाठी नरेंद्र गजपुरे, नितेश राठोड, गौरव आलाम, कमलेश खोबरागडे, योगेश नैताम, अभिजित धाईत, उमेश कुळमेथे, आकाश परसा, प्रशांत कोराम, मनोज दुनेदार, जिशान मेमन, महेश जिल्लेवार, भुषण भैसारे, कुलदीप इंदूरकर, पुरूषोत्तम बावणे, भुपेंद्र राजगिरे यांनी सहकार्य केले.
सरकारला जनताच धडा शिकवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:00 AM
विद्यमान केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले असून या निष्क्रीयतेबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जनताच या निष्क्रीय सरकारला धडा शिकविणार, असा विश्वास युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देकुणाल राऊत यांचे प्रतिपादन : ‘चलो पंचायत अभियाना’चा आढावा