मागास भागाच्या विकासाकरिता टाटा ट्रस्टने अनेक लोकाेपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातच गडचिरोली जिल्ह्यात सिंचन सुविधा कमी आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या तलावात अधिक जलसाठा व्हावा म्हणून जिल्ह्यातील लघु सिंचन विभागाच्या मामा तलावाचे खोलीकरण टाटा ट्रस्टकडून सुरू आहे. खोलीकरण करताना निघालेली माती तलावाच्या पाळीवर टाकल्यास तलावाचे मजबुतीकरण होऊन जलसाठा अधिक होईल. त्यामुळे तलावाचे खोलीकरण केल्यानंतर माती प्राधान्याने पाळीवर टाकण्यात यावी, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश असताना तलाव खोलीकरणाची माती इतरत्र टाकली जाते. आरमोरी तालुक्यातील मेंढेबोडी, येंगाडा, चामोर्शी (माल) सुकाळा, मांगदा येथील तलावाचे खोलीकरण झाले; परंतु तलावातून उपसलेली माती पाळीवर न टाकता इतरत्र टाकण्यात आली. सुकाडा येथे तर तलावाच्या खोलीकरणातून काढलेली माती कक्ष क्रमांक २३ या बिटात टाकण्यात आली. एवढ्यावरच न थांबता तेथील झाडे तोडून सदर मातीने पांदण रस्ता तयार करण्यात आला. यासाठी कोणताही आराखडा तयार करण्यात आला नाही किंवा वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली नाही. यात मोठ्या प्रमाणात झाडांची हानी झाली; परंतु सदर प्रकारापासून वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ आहेत.
कोट
टाटा ट्रस्टकडून ज्या तलावाचे खोलीकरण सुरू आहे, त्यातून निघालेली माती प्रथम तलावाच्या पाळीवर टाकण्यात यावी हा पर्याय उपलब्ध नसेल तर ती माती शासकीय जागेत टाकावी, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. सुकाळा येथे जंगलातील झाडे तोडून सदर मातीने पांदण रस्ता तयार केला की नाही, याबाबत माहिती नाही.
सचिन डोंगरवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, आरमोरी
===Photopath===
120521\12gad_2_12052021_30.jpg
===Caption===
तलावातून उपसा केलेल्या मातीने अशाप्रकारे पांदण रस्ता तयार केला.