तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पानठेले बंद ठेवण्याचे व किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून सुद्धा नियमांचे उल्लंघन करीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरूच आहे. त्याअनुषंगाने कोरची तालुक्यातील कोटरा येथील दुकानांची ग्रामसेवक प्रशांत डोंगरवार व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या तपासणी केली. दरम्यान एका दुकानात सिगारेटची २० पॉकेट तर दुसऱ्या दुकानात एमडी तंबाखू पॉकेट व खर्रा घोटण्याचे साहित्य मिळून आले. याप्रकरणी ग्रामपंचायततर्फे दोन्ही दुकानांवर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंड ठोठावण्यात आला. तसेच जप्त करण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची गावकऱ्यांच्या उपस्थितीत होळी करण्यात आली.
तंबाखूविक्रेत्या दाेघांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 4:33 AM