लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या वतीने यंदा २०१८-१९ च्या खरीप हंगामात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालय व अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील सर्वच ८६ केंद्रावर मिळून मंगळवारपर्यंत एकूण ८ लाख ५ हजार ४०८ क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे.गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ५१ व अहेरी कार्यालयाअंतर्गत ३५ असे एकूण ८६ केंद्र सुरू आहेत. गडचिरोली कार्यालयाच्या हद्दीतील ५१ केंद्रांवरून आतापर्यंत १०१ कोटी ८५ लाख २४५ रुपये किमतीच्या ५ लाख ८२ हजार क्विंटल इतकी धानाची खरेदी झाली आहे. अहेरी कार्यालयाच्या हद्दीतील ३५ केंद्रांवरून ३९ कोटी ९६ लाख ५ हजार ३३० रुपये किमतीच्या २ लाख २३ हजार ४०८ क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे.दोन्ही कार्यालये मिळून १४० कोटी ९४ लाख ६५ हजार ५७५ रुपयाची धान खरेदी झाली आहे. सदर खरीप हंगामात एकूण ८ लाख ५ हजार ४०८ क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा, घोट आदी उपप्रादेशिक कार्यालये आहेत. कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कढोली, नान्ही, गोठणगाव, कुरखेडा, गेवर्धा, आंधळी, देऊळगाव, सोनसरी, खरकाडा, पलसगड आदी १० केंद्र आहेत. कोरची उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कोरची, मसेली, बेतकाठी, मर्केकसा, कोटरा, गोटगूल, रामगड, पुराडा, खेडेगाव, येंगलखेडा, मालेवाडा, बेडगाव आदी १३ केंद्र आहेत. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत देलनवाडी, कुरंडीमाल, दवंडी, उराडी, अंगारा, पिंपळगाव, मौशिखांब, पोटेगाव व विहीरगाव असे नऊ केंद्र आहेत. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मुरूमगाव, रांगी, दुधमाळा, कारवाफा, धानोरा, पेंढरी, मोहली, सुरसंडी, सोडे असे नऊ केंद्र आहेत.याशिवाय घोट उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मक्केपल्ली, रेगडी, घोट, गुंडापल्ली, भाडभिडी, अड्याळ, सोनापूर, आमगाव, गिलगाव, मार्र्कंडा (कं.) असे १० केंद्र आहेत. या सर्व केंद्रांवर धानाची खरेदी सुरू असून शेतकऱ्यांकडून मालाची आवक होत आहे.३९ कोटी ९२ लाखांचे चुकारे थकीतआदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आविका संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रोख स्वरूपात चुकारे अदा केले जात नाही. तर सातबारा व बँक खात्याची पडताळणी करून धानाची विक्री केलेल्या संबंधित शेतकºयाच्या बँक खात्यात आॅनलाईन स्वरूपात धानाचे पैसे वळते केले जातात. यासाठी संस्थांकडून कार्यालयाला हुंडी सादर करून सदर हुंडी मंजूर होणे आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी पाच ते सात दिवस लागतात. संस्थांकडून धान खरेदीच्या हुंड्या गडचिरोली व अहेरी कार्यालयाला मिळण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान चुकारे प्रलंबित असतात. सद्य:स्थितीत गडचिरोली व अहेरी ही दोन्ही कार्यालये मिळून एकूण ३९ कोटी ९२ लाख रुपयांचे धान चुकारे प्रलंबित असल्याची माहिती आहे. गडचिरोली कार्यालयाच्या हद्दीतील केंद्रावर धानाची विक्री केलेल्या हजारो शेतकºयांचे २२ कोटी ४५ लाख ९१ हजार व अहेरी कार्यालयाकडे १७ कोटी ४६ लाख ७९ हजार रुपयांचे धान चुकारे थकीत आहेत.
आठ लाख क्विंटलवर पोहोचली धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 1:18 AM
आदिवासी विकास विभागाच्या वतीने यंदा २०१८-१९ च्या खरीप हंगामात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालय व अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील सर्वच ८६ केंद्रावर मिळून मंगळवारपर्यंत एकूण ८ लाख ५ हजार ४०८ क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे.
ठळक मुद्देकेंद्रांवर आवक सुरूच : ८६ ठिकाणी महामंडळाची खरेदी