शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

१६ पासून शासकीय धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 11:36 PM

खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात ८८ ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरु करण्यास जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यानी मान्यता प्रदान केली आहे.

ठळक मुद्दे१५५० रूपये हमीभाव : जिल्हाभरात ८८ केंद्रांना मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात ८८ ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरु करण्यास जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यानी मान्यता प्रदान केली आहे. ही खरेदी जिल्हा मार्केटिंग अधिकारी तसेच आदिवासी विकास महामंडळ यांच्या वतीने करण्यात येणार आहे. १६ आॅक्टोबरपासून खरेदीस प्रत्यक्षात सुरु होईल.शासनाने किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धानाला यंदा १५५० रुपये भाव निश्चित केला आहे. कोरची तालुक्यातील कोरची, मसेली, बेतकाठी, मरकेकसा, बेडगाव, कोटरा, कुरखेडा तालुक्यातील रामगड, पुराडा, खेडेगाव, मालेवाडा, यंगलखेडा, कुरखेडा, आंधळी, कढोली, खरकाडा, गेवर्धा, नान्ही, देऊळगाव, गोठणगाव, सोनसरी, अंगारा, उराडी, आरमोरी तालुक्यातील देलनवाडी, दवंडी, कुरंडीमाल, देसाईगंज तालुक्यातील पिंपळगांव, विहीरगाव, गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब, धानोरा तालुक्यातील रांगी, मुरुमगाव, धानोरा, दुधमाळा, कारवाफा, पेंढरी, मोहली, चामोर्शी तालुक्यातील घोट, मक्केपल्ली, रेगडी, आमगाव, अडयाळ, सोनापूर, गुंडापल्ली, भाडभिडी, गिलगाव, अहेरी तालुक्यातील अहेरी, बोरी, कमलापूर, वेलगूर, इंदाराम, उमानूर, आलापल्ली, पेरमिली, जिमलगट्टा, मुलचेरा तालुक्यातील लगाम, मुलचेरा, सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा, झिंगानूर, असरअल्ली, अमरादी, अंकिसा, वडधम, जाफ्राबाद, रोमपल्ली, भामरागड तालुक्यातील भामरागड, लाहेरी, ताडगाव, कोठी, मन्नेराजाराम, एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली, गट्टा, तोडसा, घोटसूर, कसनसूर, जारावंडी, गेंदा, कोठमी, हालेवारा अशा एकूण ८८ गावांमध्ये धान खरेदी केंद्र सुरु होणार आहेत.सलग दुसºया वर्षी योग्यवेळी धान खरेदी सुरु करण्यात येत आहे. याच नियोजनामुळे मागील हंगामात विक्रमी खरेदी होऊन शेतकºयांना लाभ झाला होता.