लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्वांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्याचा विकास गतिमान झालेला आहे. येणाऱ्या काळात देखील सामान्य नागरिक केंद्रस्थानी माणून विकासगंगा पुढे जाईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन राज्याचे वने तसेच आदिवासी विकास राज्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापनदिनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्षा योगीता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेष बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड तसेच सहायक जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, उपवनसंरक्षक शिवाजी फुले आदी उपस्थित होते.आपल्या या आदिवासीबहूल आणि दुर्गम जिल्ह्यात सर्वांपर्यंत विकास पोहोचावा यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. &‘सबका साथ सबका विकास’ ही प्रेरणा घेऊन &‘आम आदमी’चा विकास हे ध्येय्य आहे. आपला जिल्हा विकासाच्या बाबतीत बराच मागासलेला आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी ‘आकांक्षित जिल्हा’ कार्यक्रमात गडचिरोलीची निवड केली आहे, असे सांगून ते म्हणाले की, कोणतेही आव्हान हे संधी म्हणून स्विकारले तर आपल्याला चांगले कार्य उभे करता येते. या भूमिकेतून जिल्ह्यावर असणारा मागासलेपणाचा ठसा मिटविण्यासाठी जिल्हा प्रशासन आता कामाला लागले आहे. यातील विविध निर्देशांकांची उद्दिष्टे निश्चित करुन सन २०२२ पर्यंतच्या प्रगत गडचिरोलीचा आराखडा नजरेसमोर ठेवून काम सुरु झाले आहे. यात शासन पूर्ण क्षमतेने आर्थिक पाठबळ देईल, याची ग्वाही मी आज आपणास देतो असेही ते म्हणाले.जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट व्हावे व शेतकरी खºया अर्थाने समृध्द व्हावा यासाठी विविध कार्यक्रम शासनाने हाती घेतले आहेत. जिल्ह्यात ७८ टक्के वनक्षेत्र असल्याने मोठे प्रकल्प उभारणे शक्य नाहीत. हे लक्षात घेऊन जिल्ह्यात जलयुक्त शिवार, तसेच मागेल त्याला शेततळे आणि विहिरी बांधण्यासोबत मामा तलाव दुरुस्तीमधून सिंचन क्षमता वाढविण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.संचालन क्रीडा अधिकारी मदन टापरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºयांचा सत्कार करण्यात आला.
सामान्य व्यक्तीचा विकास हाच शासनाचा उद्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:52 PM
सर्वांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्याचा विकास गतिमान झालेला आहे. येणाऱ्या काळात देखील सामान्य नागरिक केंद्रस्थानी माणून विकासगंगा पुढे जाईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन राज्याचे वने तसेच आदिवासी विकास राज्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : स्वातंत्र्यदिनी जिल्हा पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण