आरमोरी शहरात नव्या कोरोनोचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. किराणा, भाजीपाला, फळ व इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू आहेत. मात्र, यामुळे अनेक किराणा दुकाने व भाजीपाला दुकानांमध्ये गर्दीचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. दुकान सुरू असल्याच्या नावावर अनेक नागरिक बाहेर फिरताना दिसत आहेत. यामुळे कोरोनोची साखळी तुटणार नाही. कोराेनाची साखळी तोडण्यासाठी शहरात कडक लाॅकडाऊन लावण्याची गरज आहे.
सध्या सुरू असलेल्या दुकानांमुळेच शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्याचे नाकारता येत नाही. शहरात १ ते ८ मेपर्यंत कडक लाॅकडाऊन करण्यात यावे, यामध्ये फक्त आरोग्य सुविधा सोडून सर्व दुकाने बंद करण्यात यावीत. याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी प्रशांत मोटवानी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.