शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
4
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
6
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
7
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
9
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
10
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
11
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
12
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
13
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
14
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
15
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
16
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
17
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
18
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
19
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
20
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

वडधातील बाजाराच्या जागेचा प्रश्न कायमच

By admin | Published: May 25, 2014 11:35 PM

वडधा येथे दर रविवारला आठवडी बाजार भरत असतो. वडधा येथे परिसरातील नागरिक बाजार करण्यासाठी मोठय़ा संख्येने येत असतात. सदर बाजार डार्ली मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भरत असतो.

वडधा : वडधा येथे दर रविवारला आठवडी बाजार भरत असतो. वडधा येथे परिसरातील नागरिक बाजार करण्यासाठी मोठय़ा संख्येने येत असतात. सदर बाजार डार्ली मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भरत असतो. वाढत्या अंतर्गत वाहतुकीमुळे डार्ली मार्गावर वाहनाची कोंडी होत असते. त्यातच बाजाराच्या दिवशी बैलांचे कळपसुध्दा याच मार्गावरून ये-जा करीत असतात. त्यामुळे विक्रेते व ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने बैल मोकाटच आहेत. परंतु सायंकाळच्या सुमारास बैल बाजारात भाजीपाला खाण्यासाठी येतात. त्यामुळे ग्राहकांसह विक्रेत्यांचीही तारांबळ उडत असते. पावसाळय़ात तर डार्लीच्या जंगलात गुराखी बैल चारण्यासाठी याच मार्गाने नेत असतात. सायंकाळी परत याच मार्गाने बाजारातून बैल आणीत असतात. त्यामुळे आधीच अरूंद असलेला रस्ता बैलांनी भरून जातो. ग्राहकांना रस्त्यावर उभे राहणेसुध्दा जागा उरत नाही. मागील अनेक दिवसांपासून वडधा येथे आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून स्थानिक प्रशासनाकडे करण्यात येत आहे. परंतु सदर मागणीकडे स्थानिक प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वडधा परिसरातील ग्राहक व विक्रेत्यांनाही बाजारात नाहक त्रास सहन करावा लागतो.

बाजार दुसर्‍या ठिकाणी हलविल्यास आणखी विस्तार वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांच्या मागणीची दखल घेत वडधा येथे आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील विक्रेते व ग्राहकांनी केली आहे. (वार्ताहर)