शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
2
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
3
उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला आली, पण मविआ, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटेना, अजून एवढ्या जागांवर वाद कायम
4
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
5
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
6
Rule Change: एलपीजी ते क्रेडिट कार्डापर्यंत; १ नोव्हेंबरपासून होणार 'हे' ६ बदल, खिशावर होणार परिणाम
7
सोफिया सीव्हिंगने 'इंडिया मास्टर्स पिकलबॉल' स्पर्धेत मारली बाजी! मिळवलं पहिल्या हंगामाचं जेतेपद
8
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
9
नागा चैतन्यने पुसून टाकली समांथाची शेवटची आठवण! शोभिताशी लग्न करण्यापूर्वी Ex पत्नीसोबतचा फोटो केला डिलीट
10
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
11
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
12
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
13
Stock Market Opening: दिवाळीच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २४,२५० वर; सेन्सेक्सही वधारला
14
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
15
याेगी यांच्या भक्तीमागे संघाचीही शक्ती; ‘संघ-भाजप’मध्ये सारे आलबेल : सहकार्यवाह होसबळे
16
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
17
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
18
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार
19
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
20
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा

सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदानासाठी रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 5:00 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, राज्याचे माजी आरोग्य व उद्योगमंत्री तथा ‘लाेकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य ...

ठळक मुद्देबाबूजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर : ‘लोकमत’च्या उपक्रमाला पोलिसांची साथ; जवानांचा सक्रीय सहभाग

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, राज्याचे माजी आरोग्य व उद्योगमंत्री तथा ‘लाेकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी गडचिरोलीत आयोजित रक्तदान शिबिरासाठी विविध क्षेत्रांतील नागरिकांसह पोलीस जवानांनी उत्साहाने सहभागी होऊन सामाजिक बांधीलकीचा  परिचय दिला.काॅम्प्लेक्समधील पाेलीस रुग्णालयात झालेल्या या शिबिराच्या उद्घाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, तर प्रमुख अतिथी म्हणून अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अ. पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अनिल रुडे, सीआरपीएफच्या १९२ बटालियनचे कमाडिंग ऑफिसर जियाऊ सिंह, द्वितीय कमांडिंग ऑफिसर प्रभात गौतम व दीपक शाहू आणि उपकमाडंट सपन सुमन व संध्या राणी, आदी अधिकारी गण प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी बाबूजींच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी ५३ नागरिकांनी रक्तदान केले. काही रक्तदात्यांना येण्यास उशीर झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदानासाठी पाठविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लाेकमत’चे कार्यालय प्रमुख डाॅ. गणेश जैन यांनी, तर जिल्हा प्रतिनिधी मनाेज ताजने यांनी सूत्रसंचालन केले. मार्गदर्शन कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष रक्तदानाला सुरुवात झाली.या कार्यक्रमासाठी पाेलीस उपअधीक्षक (गृह) अरविंदकुमार कतलाम, पाेलीस कल्याण शाखेचे निरिक्षक नागनाथ सूर्यवंशी, लोकमत इव्हेंट संयोजिका रश्मी आखाडे, जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या डाॅ. अंजली साखरे, रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी सतीश तडकलावार, नरेश तन्नपुरीवार, विवेक गाेनाडे, सुरेश चांदेकर, लाेकमत समाचारचे हरीश सिडाम, लाेकमतचे दिगांबर जवादे, दिलीप दहेलकर, गोपाल लाजूरकर, विकास चौधरी, विवेक कारेमोरे, श्रीरंग कस्तुरे, निखिल जरूरकर, प्रज्वल दुर्गे, तसेच लोकमत सखी मंचच्या सोनिया बैस, नलिनी बोरकर, विभा उमरे, अंजली वैरागडवार, रोहिनी मेश्राम, मृणाल उरकुडे, वंदना दरेकर आदींनी सहकार्य केले. 

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट