काेराेना लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प आहेत. शेतेकरी व शेतमजुरांचे हाल हाेत आहेत. अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमती प्रती बॅग ६०० ते ७१५ रुपयांपर्यंत वाढविल्या. या निर्णयाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. भाजप नेतृत्वातील केंद्र सरकारचे धाेरण शेतकरीविराेधी आहे, असा आराेप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अविनाश हुमणे, रायुकाँ तालुकाध्यक्ष स्वप्निल कराडे, शहर अध्यक्ष चेतन कराडे, आनंद पंधरे, विनोद गुरनुले, अजय ताराम, राजेंद्र भैसारे, प्रशांत कराडे, चंद्रशेखर वालदे उपस्थित होते.
===Photopath===
190521\19gad_1_19052021_30.jpg
===Caption===
तहसीलदार सी. आर. भंडारी यांना निवेदन देताना रा.काॅ. पदाधिकारी.