आॅनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एकूण २८ हजार ४०० सर्वसाधारण हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी २ जानेवारीपर्यंत केवळ १८ हजार ७५८ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे. केवळ ६६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून उर्वरित क्षेत्र पडीक आहे.यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. शेवटी पाऊस पडला नाही. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. काही जमीन तर पूर्णपणे सुकली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिचंनाची सुविधा उपलब्ध नाही. अशा शेतकºयांनी पिकांची पेरणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. धानपीक निघाल्यानंतर धानाच्या बांधीतच बहुतांश शेतकरी कडधान्य व गळीतधान्याची पेरणी करतात. मात्र जमिनीत आताच ओलावा नाही. रबी पिके जवळपास मार्च महिन्यापर्यंत निघतात. या कालावधीपर्यंत ओलावा राहिला नाही तर पीक करपण्याची शक्यता असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली नाही.गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ४०० हेक्टर आहे. त्यापैकी केवळ १८ हजार ७५८ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे. त्यातही शेतकरी आता पारंपरिक पिकांकडे पाठ फिरवित नगदी पिकांचे उत्पादन घेण्याकडे वळत असल्याचे दिसून येते. रबीची पेरणी घटत चालली आहे. ही धोक्याची घंटा आहे. अनेक शेतकºयांकडे सिंचन विहिरींची संख्या वाढत असतानाही रबीचे क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी होत चालले आहे. कमी सिंचन व खर्चात उत्पादन होईल, अशी पिके घेण्याबाबत सल्ला देण्याची गरज निर्माण झाली आहे.१ हजार ३९९ हेक्टरवर मक्याचे पीकमका पिकासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन योग्य आहे. त्यामुळे मका पिकाचे चांगले उत्पादन होते. या पिकासाठी सिंचनाचीही फारशी गरज पडत नाही. परिणामी शेतकरी ज्वारी, हरभरा यासारख्या पिकांकडे पाठ फिरवित मका पिकाची लागवड करण्याकडे वळत आहेत. यापूर्वी केवळ मुलचेरा व सिरोंचा तालुक्यातच मका पिकाचे उत्पादन घेतले जात होते. मात्र आता मक्याचे क्षेत्र वाढत चालले असून संपूर्ण जिल्ह्यात त्याचा विस्तार होत आहे. यावर्षी सुमारे ३ हजार ४९९ हेक्टरवर मका पिकाची पेरणी झाली आहे. सिरोंचा तालुक्यात २०० हेक्टर, धानोरा ५४७, मुलचेरात २८१ हेक्टर, चामोर्शी तालुक्यात ६८ हेक्टर, एटापल्ली तालुक्यात १११ हेक्टर, भामरागड तालुक्यात ३३ हेक्टर, कोरची तालुक्यात २१ हेक्टर व कुरखेडा तालुक्यात ३० हेक्टर, आरमोरी तालुक्यात ६० हेक्टरवर मका पिकाची लागवड झाली आहे.२ हजार ४१८ हेक्टरवर हरभरा पीक, ७ हजार ६८५ हेक्टरवर लाखोळी, १ हजार ५९९ हेक्टरवर मूग, ९९३ हेक्टरवर उडीद, ३६५ हेक्टरवर बरबटी, १३४ हेक्टरवर चवळी, ८१२ हेक्टरवर वाल, पोपट, १ हजार ४८४ हेक्टरवर जवस, ५४७ हेक्टरवर भूईमूग पिकाची लागवड झाली आहे.
रबी पिकांची पेरणी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 11:15 PM
गडचिरोली जिल्ह्यात एकूण २८ हजार ४०० सर्वसाधारण हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी २ जानेवारीपर्यंत केवळ १८ हजार ७५८ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे.
ठळक मुद्दे१९ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण : सर्वसाधारण क्षेत्राच्या ४४ टक्के क्षेत्र पडीक