शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

रबी हंगामातील ७० हजार क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 10:07 PM

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ च्या खरीप व रबी हंगामात विक्रमी धान खरेदी करण्यात आली. खरीप हंगामातील गडचिरोली कार्यालयाचे धान भरडाईचे काम ८५ टक्के तर अहेरी कार्यालयाचे काम ५७ टक्क्यावर पोहोचले.

ठळक मुद्देपावसाने नुकसानीची शक्यता : गडचिरोलीत ८५ टक्के तर अहेरीत ५७ टक्के भरडाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ च्या खरीप व रबी हंगामात विक्रमी धान खरेदी करण्यात आली. खरीप हंगामातील गडचिरोली कार्यालयाचे धान भरडाईचे काम ८५ टक्के तर अहेरी कार्यालयाचे काम ५७ टक्क्यावर पोहोचले. सद्य:स्थितीत रबी हंगामातील जवळपास ७० हजार क्विंटल धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवण्यात आला आहे. या धानाची लवकर उचल न झाल्यास पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली कार्यालयामार्फत २०१८-१९ च्या खरीप हंगामात एकूण ७ लाख २७ हजार ८९८ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. यापैकी केंद्रावरून धानाची उचल करून ६ लाख २२ हजार ३८८ क्विंटल धानाची राईस मिलर्सकडून भरडाई करण्यात आली. आता १ लाख ३ हजार १२१ क्विंटल धान आविका संस्थेकडे शिल्लक आहे. एवढ्या धानाचे भरडाईचे आदेश देणे शिल्लक आहे. १ लाख ३ हजार १२१ क्विंटल पैकी १ लाख २ हजार क्विंटल धान संस्थेच्या गोदामात सुरक्षितरित्या ठेवण्यात आला आहे.खरीप हंगामातील केवळ एक हजार क्विंटल धान उघड्यावर आहे. रबी हंगामात गडचिरोली कार्यालयाच्या हद्दितील केंद्रावर १ लाख १२ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी ३३ हजार ३९५ क्विंटल धान भरडाईसाठी मिलर्सकडे देण्यात आले आहे. आविका संस्थेकडे शिल्लक असलेल्या ७८ हजार ७३३ क्विंटल धानापैकी १६ हजार क्विंटल धान गोदामात सुरक्षितरित्या ठेवण्यात आले. रबी हंगामातील उर्वरित ६० हजार क्विंटल धान ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आला आहे.अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत खरीप हंगामात २ लाख ८२ हजार ४५७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी दीड लाख क्विंटल पेक्षा अधिक धानाची मिलर्सकडून भरडाई करण्यात आली आहे.उर्वरित सर्व धान गोदामात सुरक्षितरित्या ठेवण्यात आला आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दितील रबी हंगामातील अंकिसा व वडधम या दोन केंद्रावरील केवळ १० हजार क्विंटल धान ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आला आहे.आठवडाभरात धानाची उचल करणारखरीप हंगामातील धान उघड्यावर नाही. रबी हंगामातील उघड्यावर ठेवण्यात आलेल्या धानाची येत्या आठवडाभरात उचल करण्यात येईल. जेणे करून महामंडळ व आविका संस्थेचे पावसाने नुकसान होणार नाही, अशी माहिती महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाचे उपव्यवस्थापक मुळेवार व गडचिरोली कार्यालयाचे उपव्यवस्थापक उमाळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.