ऑनलाईन लोकमतरांगी : धानोरा तालुक्याच्या रांगी परिसरातील जवळपास ३२ गावातील नागरिकांना औषधोपचार पुरविण्याच्या उद्देशाने रांगी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. मात्र डॉक्टरांकडून उपचार न झाल्याने येथील रूग्णांना धानोराला जावे लागले. त्यामुळे संबंधित डॉक्टराबाबत परिसरात रोष व्यक्त होत आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाºयांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र रंगपंचमीच्या दिवशी शुक्रवारला सायंकाळी सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन रूग्ण उपचारासाठी आले. मात्र या रूग्णांना दवाखान्याच्या बाहेर टाईल्सवर ठेवण्यात आले. येथून धानोराला रेफर करण्यात आले नाही. दवाखान्यात कोणीच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने अखेर खासगी वाहनाने दोन रूग्णांना धानोराला न्यावे लागले. शुक्रवारी सायंकाळी पिसेवडधा-वनखेडा मार्गावर दुचाकीला अपघात झाला. यातील जखमी प्रफुल उसेंडी (२३) रा. सतीटोला, रोशन कुळमेथे (२५) रा. खांबाडा यांना आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र येथे डॉक्टर उपस्थित नसल्याने त्यांना वºहांड्यात ठेवण्यात आले.रिक्त पदाने सेवेवर परिणामरांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सफाईगार (स्वीपर)चे पद मागील दोन वर्षांपासून रिक्त आहे. तसेच येथे परिचारिकेचेही पद रिक्त आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. परिचारिका नसल्याने डॉक्टरला ओपीडी चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. रिक्त पदे भरावीत.
रांगीचे आरोग्य केंद्र रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 1:02 AM
धानोरा तालुक्याच्या रांगी परिसरातील जवळपास ३२ गावातील नागरिकांना औषधोपचार पुरविण्याच्या उद्देशाने रांगी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले.
ठळक मुद्देरूग्णवाहिका मिळाली नाही : दोन रूग्णांना दवाखान्याच्या बाहेरच ठेवावे लागले