लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर गडचिरोलीसह जिल्हाभरात शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली. पहाटे ३ वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस बरसला. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास पुन्हा ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. वरुणराजाचे हे वाजतगाजत झालेले आगमन काही वेळासाठी जीवाचा थरकाप उडविणारे असले तरी त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव भांड्यात पडला आहे. आता पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या दुसºया आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होते. समाधानकारक पाऊस पडताच पेरण्यांना सुरूवात होते. यावर्षी मात्र पावसाने चांगलीच दडी मारली होती. १५ दिवसांपूर्वी थोडाफार पाऊस झाला. मात्र पेरणीसाठी पुरेसा ओलावा जमिनीत नसल्याने शेतकºयांनी पेरण्या केल्यानंतर ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे अशाच शेतकºयांनी धानाचे पºहे भरले. मात्र ९५ टक्क्यांहून अधिक शेतकºयांनी पºहे व इतर पिकांची पेरणी केली नाही. शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतिक्षेत होता. उन्हाळ्याप्रमाणे दिवसा कडक ऊन पडत असल्याने उकाड्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते.शुक्रवारी पहाटे ३ आणि सायंकाळी ५ वाजतानंतर दमदार पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाऊस बरसत होता. त्यानंतरही रिमझिम पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तसेच या पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. पाऊस पडेल, या अपेक्षेने शेतकºयांनी याआधीच बियाणे व खते खरेदी करून ठेवली. कर्ज घेण्यासाठीही शेतकºयांची लगबग मागील काही दिवसांपासून वाढली आहे.जिल्हाभरातील मामा तलाव अजुनही कोरडे ठाकचगडचिरोली जिल्ह्यात दिना जलाशय व येंगलखेडा प्रकल्प आहे. दिना जलाशयात उपयुक्त जलसाठा काहीच नाही. तर येंगलखेडा प्रकल्पात २७.०६ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणात १६.४ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा आहे. सती, वैनगंगा, गाढवी, कठाणी, खोब्रागडी, प्राणहिता या नद्यांची पातळीही अतिशय कमी आहे. जिल्हाभरातील मामा तलाव अजुनही कोरडेठाकच आहेत.अपेक्षित पावसाच्या केवळ २४ टक्केचहवामान खात्याकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २८ जूनपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात १८९.७ मिमी पाऊस पडणे आवश्यक होता. मात्र प्रत्यक्षात यावर्षी केवळ २५.५ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी २८ जूनपर्यंत सुमारे २१८ मिमी पाऊस झाला होता. सर्वच तालुक्यांमध्ये यावर्षी कमी पाऊस झाला आहे.शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासात गडचिरोली तालुक्यात १६.३, कुरखेडा २४.९, आरमोरी २४.५, चामोर्शी ०.७, सिरोंचा ०.१, अहेरी ०.३, धानोरा ४.५, कोरची २२.९, देसाईगंज ९.७, मुलचेरा १.३, भामरागड १३.८ मिमी पाऊस पडला आहे.उशीरा पेरणी झाल्यास उत्पादनात घट होत असल्याचा अनुभव शेतकºयांना असल्याने यावर्षी उत्पादनात घट होईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पावसाअभावी जिल्हाभरातील धान रोवणीची कामेही लांबणार आहेत.
पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव भांड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:12 PM
तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर गडचिरोलीसह जिल्हाभरात शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली. पहाटे ३ वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस बरसला. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास पुन्हा ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले.
ठळक मुद्देगडगडाट आणि कडकडाटाने उडाला थरकाप : उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा, पेरणीला येणार वेग